नागपुरातील रामबाग झोपडपट्टीत इसमाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:18 AM2018-06-09T01:18:44+5:302018-06-09T01:19:00+5:30

एका निराधार आणि गरीब इसमाच्या डोक्यात फटका मारून अज्ञात आरोपीने त्याची हत्या केली. दिलीप राजाराम इंगळे (वय ५८) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर रामबाग परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला.

His bloodless blood in the Rampagh slum in Nagpur | नागपुरातील रामबाग झोपडपट्टीत इसमाचा निर्घृण खून

नागपुरातील रामबाग झोपडपट्टीत इसमाचा निर्घृण खून

Next
ठळक मुद्देडोक्यावर जाड वस्तूने केले प्रहार

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका निराधार आणि गरीब इसमाच्या डोक्यात फटका मारून अज्ञात आरोपीने त्याची हत्या केली. दिलीप राजाराम इंगळे (वय ५८) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर रामबाग परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला.
रामबागमधील मिलिंद बुद्धविहाराजवळ राहणारा इंगळे मोलमजुरी करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी आणि तरुण मुलगा त्याला सोडून वेगळे राहायला गेले. इकडे मिळेल ते काम करून मिळालेल्या पैशातून तो दारू प्यायचा. गुरुवारी रात्री तो त्याच्या झोपडीत झोपला. आज सकाळपासून त्याच्या घरातून काहीच हालचाल दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी डोकावून बघितले असता त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर कुणीतरी जाडसर वस्तूने फटका हाणल्याचे दिसत होते. माहिती कळताच इमामवाड्याचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी पंचनामा आदी आटोपल्यानंतर मृतदेह मेडिकलला रवाना केला. मृताचा भाऊ आनंद राजाराम इंगळे (वय ६२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. दुपारी ४ वाजता एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर प्रकरणाची चौकशी सुरू होती.

भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

भरधाव ट्रकची धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा करुण अंत झाला तर, दुसरा एक युवक गंभीर जखमी झाला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
राम गणेश कनोजिया (वय ३७) आणि सय्यद शाहिद अली (वय १७, रा. दोघेही दीपकनगर) हे गुरुवारी सकाळी एमएच ३१/ बीआर - १०६४ क्रमांकाच्या दुचाकीने जरीपटक्यातून जात होते. गुरुनानक कॉलेज मार्गावरील अमन लॉनसमोर ट्रक क्रमांक सीजी ०४/ जेसी ९२१७ च्या चालकाने वेगात आणि निष्काळजीपणे ट्रक चालवून कनोजियांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे कनोजियांचा करुण अंत झाला. तर सय्यद शाहिद गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. जरीपटका पोलिसांनी सय्यदच्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी सुरू आहे.

मुलीचा विनयभंग, वडिलांना मारहाण
आरोपी नातेवाईकाने मुलीचा विनयभंग करून तिच्या वडिलांना मारहाण केली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. पीडित तक्रारदार युवती १७ वर्षांची आहे. तिची मोठी बहीण बाळंतपणाच्या निमित्ताने तिच्या घरी आली आहे. आरोपी नातेवाईक गणेश आत्माराम हेडावू (वय ३२, रा. तांडापेठ) गुरुवारी रात्री पीडितेच्या घरी आला. त्याने घरात येऊन पीडितेला अश्लील शिवीगाळ केली तर तिच्या वडिलांना हातबुक्कीने मारहाण केली. या घटनेनंतर आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यांनी आरोपीला आवरले. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार आरोपी हेडावूविरुद्ध गुन्हा दाखल केला.

भिंत अंगावर पडल्याने मजूर ठार

भिंत अंगावर पडल्याने एका मजुराचा करुण अंत झाला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. राजू उईके (वय २०) असे मृत मजुराचे नाव आहे. तो सवेनिया (नैनपूर, मंडला) येथील रहिवासी होता.

दोघांनी लावला गळफास
गिट्टीखदानमधील हजारी पहाड वस्ती, वायुसेनानगरात राहणारे सुरज देवीदास मसराम (वय ३१) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पूजा सूरज मसराम (वय २५) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
त्याचप्रमाणे मानकापूरच्या साई सेवाश्रम सोसायटी, उत्थान नगरात राहणारे गोविंदप्रसाद रामलाल शाहू (वय ३२) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संतोष रामलाल शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: His bloodless blood in the Rampagh slum in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.