‘त्याचा’ मृत्यू गळफास लागून नव्हे तर गळा आवळून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:49+5:302021-01-10T04:07:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : ‘पाॅर्न क्लिप’चे अनुकरण करीत सेक्स केल्यानंतर तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना खापरखेडा पाेलीस ...

‘His’ death not by strangulation but by strangulation? | ‘त्याचा’ मृत्यू गळफास लागून नव्हे तर गळा आवळून?

‘त्याचा’ मृत्यू गळफास लागून नव्हे तर गळा आवळून?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : ‘पाॅर्न क्लिप’चे अनुकरण करीत सेक्स केल्यानंतर तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथील महाराजा लाॅजमधील खाेलीत गुरुवारी (दि. ७) सायंकाळी उघडकीस आली. त्याचा मृत्यू गळफास लागून नव्हे तर गळा आवळून झाल्याचा आराेप त्याच्या कुटुंबीयांनी केल्याने पाेलिसांनी शनिवारी (दि. ९) खुनाचा गुन्हा नाेंदवून त्या तरुणीस ताब्यात घेतले आहे.

दाेघेही नागपूर शहरातील टेकानाका परिसरातील रहिवासी असून, तरुण २७ व तरुणी २६ वर्षाची आहे. त्यांनी खाेलीत ‘पाॅर्न क्लिप’ बघितल्यानंतर त्याच्या हात, पाय व गळ्याला दाेरी बांधून खुर्चीवर सेक्स केला. तरुणी बाथरूममध्ये गेल्यानंतर ताेल गेल्याने ताे पडला आणि दाेरीचा फास गळ्याला आवळल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती तरुणीने पाेलिसांना दिल्याने त्यांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून प्रकरण तपासात घेतले.

दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी खापरखेडा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत त्याचा गळा आवळून खून केल्याचा आराेप केला. उत्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह आपल्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्या गळ्यावर आवळल्याचे निशान हाेते. त्यामुळे त्याचा अपघाती मृत्यू नसून गळा आवळून खून करण्यात आला, असा आराेप त्याच्या कुटुंबीयांनी या तक्रारीत केला. पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेवरून ठाणेदार भटकर यांनी या प्रकरणात भादंवि ३०२ दाखल करून आराेपी तरुणीस चाैकशीसाठी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्ताे तिला अटक करण्यात आली नव्हती.

...........

अपघात झाल्याची माहिती

मृत तरुण विवाहित असून, त्याचे त्या तरुणीशी दाेन वर्षांपासून प्रेमसंबंध हाेते. याची त्याच्या कुटुंबीयांना माहिती हाेती. ताे गुरुवारी दुपारी छाेट्या मुलाला घेऊन डाॅक्टरकडे जात असताना त्याला तरुणीचा फाेन आला. त्यानंतर ताे आपण कामानिमित्त सावनेरला जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. ताे सायंकाळपर्यंत घरी न असल्याने फाेनवर संपर्क केला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. रात्री १० वाजताच्या सुमारास त्याचा अपघात झाल्याची माहिती मिळाली, असेही त्याच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Web Title: ‘His’ death not by strangulation but by strangulation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.