नागपूरच्या तरुणाची ग्रीस स्पार्टाथलॉन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी
By Admin | Published: October 4, 2016 08:35 PM2016-10-04T20:35:45+5:302016-10-04T21:04:18+5:30
भारताच्या 23 वर्षीय किरेन डिसोझानं सातासमुद्रापार भारताचा जाऊन भारताचा झेंडा फडकावला आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 4 - भारताच्या 23 वर्षीय किरेन डिसोझानं सातासमुद्रापार जाऊन भारताचा झेंडा फडकावला आहे. 1 ऑक्टोबर रोजी ग्रीसमध्ये पार पडलेल्या स्पार्टाथलॉन स्पर्धेत अथेन्स ते स्पार्टा असे 246 किलोमीटरचं अंतर कापून किरेन यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
ग्रीसमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या 34 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच किरेनमुळे भारताचा झेंडा अटकेपार फडकला आहे. किरेन हा मुळचा नागपूरचा असून त्याने स्पार्टाथलॉन स्पर्धा 33 तास 2 मिनिटे 25 सेकंदांत संपवली. या स्पर्धेत तो 370 प्रतिस्पर्ध्यांमधून 86वा आला. दरम्यान, स्पर्धा संपल्यानंतर स्पार्टाथलॉन स्पर्धेत भाग घेणा-या सर्व खेळाडूंनी स्पार्टा येथील प्रसिद्ध राजा लिओनीदास यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
या स्पर्धेत किरेन 100 मैलांचं अंतर 18 तास 37 मिनिटांत कापणारा पहिला भारतीय ठरला आहे. ज्यावेळी तो 47व्या चेक पाइंटवर पोहोचला त्यावेळी त्यानं 159.5 किलोमीटर अंतर पार केलं होतं. या स्पर्धेत 370 जणांनी सहभाग नोंदवला होता. किरेन हा हाँगकाँगमध्ये 2017ला होणा-या 100 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.