कुंभारे, कोल्हे यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:07 AM2021-03-24T04:07:36+5:302021-03-24T04:07:36+5:30

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सदस्यत्व रद्द झालेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे व राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांना ...

Hit the potter, the fox | कुंभारे, कोल्हे यांना फटका

कुंभारे, कोल्हे यांना फटका

Next

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सदस्यत्व रद्द झालेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे व राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांना महिला आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. २०२० च्या निवडणुकीत कुंभारे निवडून आलेले केळवद हे सर्कल सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित झाले आहे, तर चंद्रशेखर कोल्हे यांचे पारडसिंगा हे सर्कलही महिलासाठी आरक्षित झाले आहे. भाजपच्या ज्या चारही सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते, त्यांना लढण्याची पुन्हा संधी आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या १७ मार्च २०२१ च्या पत्रानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील तीन मुद्द्यांचा निकष लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी नामप्र प्रवर्गातून २०२० च्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करीत, त्या सर्व जागा खुल्या केल्या. खुल्या झालेल्या जागांवर मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे यांच्या उपस्थितीत महिला आरक्षण काढण्यात आले. महिला आरक्षण काढताना राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २००२, २००७ व २०१२ या वर्षांत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आरक्षणाचा निकष लावण्यात आला. या निकषाच्या आधारे जिल्हा परिषदेचे ८ सर्कल सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आले.

- सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित झालेले सर्कल

सावरगाव, पारडसिंगा, वाकोडी, केळवद, करंभाड, वडोदा, डिगडोह व इसासनी-डिगडोह

- हे सर्कल झाले सर्वसाधारण

भिष्णूर, गोधनी रेल्वे, येनवा, राजोला, गुमथळा, नीलडोह, बोथिया पालोरा, अरोली

- यांना पुन्हा संधी

समीर उमप (येनवा), अनिल निधान (गुमथळा), राजेंद्र हरडे (नीलडोह), अर्चना गिरी (इसासनी-डिगडोह), भोजराज ठवकर (राजोला), सुचिता ठाकरे (डिगडोह), देवका बोडखे (सावरगाव), कैलास राऊत (बोथिया पालोरा), अवंतिका लेकुरवाळे (वडोदा), योगेश देशमुख (अरोली), अर्चना भोयर (करंभाड), ज्योती शिरस्कर (वाकोडी)

- येथे संधी तरीही बदल अपेक्षित

ज्या सर्कलमधून २०२० मध्ये महिला निवडून आल्या होत्या. ते सर्कल आरक्षणाच्या सोडतीत सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे त्या महिला सदस्यांना संधी असली तरी, तिथे बदल होईल असे संकेत आहेत. यात पूनम जोध (भिष्णूर), ज्योती राऊत (गोधनी रेल्वे) या सर्कलचा समावेश आहे.

Web Title: Hit the potter, the fox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.