नागपुरात होर्डिंग हटविले ; पोलिसात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:46 AM2018-03-18T00:46:18+5:302018-03-18T00:46:32+5:30
उच्च न्यायालयाने अवैध होर्डिग विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाही शहरात ठिकठिकाणी सर्रास अवैध होर्डिंग, बॅनर व पोस्टर लावले जात आहे. महापालिकेतील पदाधिकारीच मित्र परिवाराच्या नावाने असे कृ त्य करीत आहेत. सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील प्रमुख चौकात असे होर्डिंग लावण्यात आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या लकडगंज झोनच्या पथकाने अवैध होर्डिग जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाने अवैध होर्डिग विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाही शहरात ठिकठिकाणी सर्रास अवैध होर्डिंग, बॅनर व पोस्टर लावले जात आहे. महापालिकेतील पदाधिकारीच मित्र परिवाराच्या नावाने असे कृ त्य करीत आहेत. सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील प्रमुख चौकात असे होर्डिंग लावण्यात आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या लकडगंज झोनच्या पथकाने अवैध होर्डिग जप्त केले. त्यानतंर संबंधितावर नियमानुसार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव यांनी याला दुजोरा दिला आहे.
अवैध होर्डिंग, बॅनर हटिवण्याची कारवाई नियमित सुरु आहे. रात्रीच्या सुमारास होर्डिंग लावले जाते. याबाबतची सूचना मिळताच अवैध होर्डिंग व पोस्टर जप्त केले जाते. तसेच नियमानुसार पोलिसात तक्रार दाखल केली जाते. जे दोषी असतील त्यांना न्यायालयात हजर व्हावे लागते. शिक्षा व दंड आकारण्याचा निर्णय न्यायालयाकडून घेतला जातो. अवैध होर्डिंग लावण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल. अशी माहिती जयदेव यांनी दिली. गेल्या काही दिवसापूर्वी आमदार कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले मित्र परिवारातर्फे अवैध होर्डिग लावण्यात आले होते. झोन कार्यालयाने हे होर्डिंग जप्त केले आहे.