ंशुल्क वसुलीसाठी दुकान ताब्यात
By admin | Published: October 29, 2015 03:25 AM2015-10-29T03:25:13+5:302015-10-29T03:25:13+5:30
सतरंजीपुरा झोनमधील इतवारा धान्य बाजारातील महापाालिके ची दुकाने भाड्याने दिली आहेत.
नागपूर ; सतरंजीपुरा झोनमधील इतवारा धान्य बाजारातील महापाालिके ची दुकाने भाड्याने दिली आहेत. परंतु यातील भाडेकरु राधेयाम माहेश्वरी यांनी २००६ सालापासूनचे १९ हजाराचे वापर शुल्क न भरल्याने महापालिकेच्या बाजार विभागाने लकडगंज पोलिसांच्या मदतीने शुकव्रारी दुकान ताब्यात घेण्याची कारवाई केली.
धान्य बाजारातील दुकान क्रमांक ६७ हे माहेश्वरी यांना भाड्याने दिले होते. करारानुुसार त्यांनी दुकानाचे भाडे महापालिके च्या खात्यात जमा करावयाचे होते. परंतु २००६ सालापासून त्यांनी भाडे जमा केलेले नाही. भाडेशुल्क थकबाकी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार बाजार विभागाने नोटीस बजावली होती. परंतु त्यांनी या नोटीसची दखल घेतली नाही. तसेच थकीत रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा केली नाही. त्यामुळे त्यांना दुकान महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी दुकानाचा ताबा सोडला नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने या दुकानाचा ताबा घेण्यात आला.
तसेच दुकान शुल्काचे ९८ हजार थकबाकी असल्याने येथील अशोक ज्वाली यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी थकबाकी न भरल्याने दुकान ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. परंतु कारवाई सुरू करताच त्यांनी थकबाकी भरल्याने कारवाई स्थगित करण्यात आली.
ही कारवाई सहायक अधिक्षक नंदकिशोर भोवते यांच्या मार्गदर्शनात राजीव पवनकर, निरीक्षक विक्की धनकर, विश्वनाथ शिवणकर, संदीप घोडीमारे, अशोक नारनवरे, रामचंद्र राऊ त आदींनी पोलिसांच्या मदतीने केली. (प्रतिनिधी)