ग्वालबन्सीच्या जंगलराजला छेद

By admin | Published: April 30, 2017 01:29 AM2017-04-30T01:29:09+5:302017-04-30T01:29:09+5:30

पैसा, गुंड आणि काही भ्रष्ट पोलिसांच्या मदतीने कोराडी, मानकापूर, गिट्टीखदानसह आजूबाजूच्या भागात प्रचंड दहशत निर्माण करणारा कुख्यात भूमाफिया ग्वालबन्सी याच्या जंगलराजला पोलिसांनी छेद दिले आहे.

Hole of Gwalbansi Jungleraj | ग्वालबन्सीच्या जंगलराजला छेद

ग्वालबन्सीच्या जंगलराजला छेद

Next

मानकापूर-कोराडीसह विविध भागात नागरिकांचा आनंदोत्सव
नगरसेवक हरीश ग्वालबन्सीच्याही बांधल्या पोलिसांनी मुसक्या
पीडितांनी घेतला आपल्या भूखंडांचा ताबा

नागपूर : पैसा, गुंड आणि काही भ्रष्ट पोलिसांच्या मदतीने कोराडी, मानकापूर, गिट्टीखदानसह आजूबाजूच्या भागात प्रचंड दहशत निर्माण करणारा कुख्यात भूमाफिया ग्वालबन्सी याच्या जंगलराजला पोलिसांनी छेद दिले आहे. दिलीप आणि त्याच्या काही साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या असून, काही पळून गेले आहे. तर, काही जण पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशातीलच एक नगरसेवक हरीश ग्वालबन्सीच्या विरोधात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री त्याच्याही मुसक्या बांधल्या. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून, हर्षोल्लास करतानाच अनेक पीडितांनी आपापल्या भूखंडांचा ताबा घेतला आहे.

अभियंता भूपेश सोनटक्के यांनी स्वत:चा जीव देऊन भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या साथीदारांच्या पापाचे बिंग फोडले. त्याची जमीन बळकावणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, त्याची आर्थिक कोंडी करून त्याला जीव देण्यास प्रवृत्त करणारा भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि राजेश माटे या दोघांना मानकापूर पोलिसांनी सात दिवसांपूर्वी अटक केली.

ग्वालबन्सीच्या जंगलराजला छेद

त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा आणि परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश कलासागर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ग्वालबन्सीच्या जंगलराजचे खोदकाम सुरू केले. परिणामी मोठ्या प्रमाणावर तक्रारकर्ते समोर आले. अवघ्या एका आठवड्यात ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध सात गुन्हे दाखल झाले. आठवा गुन्हा गिट्टीखदान ठाण्यात शनिवारी दाखल झाला. त्यात नगरसेवक हरीश ग्वालबन्सीचेही नाव आहे. त्याच्यावरही विविध गंभीर आरोप आहेत.

अनेकांनी केले बांधकाम सुरू
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आश्वस्त झालेल्या भूखंडधारक आणि जमीन मालकांनी आपापल्या भूखंडांचा ताबा घेणे सुरू केले आहे. मानकापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वैभवानंद सोसायटी आणि बाजूच्या भागात मुख्य रस्त्यालगत ग्वालबन्सीने ७६ आणि २६ भूखंडावर कब्जा केला होता. २० वर्षांपासून न्यायासाठी धावपळ करणाऱ्या नागरिकांनी शुक्रवारपासून आपापल्या भूखंडांवर जाऊन तेथे कुंपण भिंत घालण्याचे काम सुरू केले आहे. या नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

४ अफवांवर विश्वास ठेवू नका
ग्वालबन्सीच्या गुन्ह्यांचा गंभीरपणा आणि व्याप्ती लक्षात घेत त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी गुरुवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती केली. परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश कलासागर यांच्या नेतृत्वात एसआयटी निर्माण करण्यात आल्याच्या २४ तासानंतरच कलासागर यांची अकोला येथे बदली झाली. त्यामुळे ग्वालबन्सीच्या गुंडांनी ‘हमरे भय्याजीने उनकी बदली किया’ अशी अफवा पसरवली. त्यामुळे सामान्य नागरिक पुन्हा भयग्रस्त झाले. मात्र, ही बदली नियमित बदली प्रक्रियेचा एक भाग असून, कलासागर यांच्या जागेवर नवीन उपायुक्त नेमला जाणार आहे. सामान्य नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, निर्भिडपणे पोलिसांकडे तक्रारी कराव्या आणि आपापली जमीन, भूखंड ताब्यात घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

—-
येथेच गाडून टाकेन (मोहनलाल गुप्ता)
लोकमतने या भागात जाऊन पीडित नागरिकांशी चर्चा केली असता या भागातील नागरिकांमध्ये अक्षरश: आनंदोत्सव साजरा केला जात असल्याचे दिसून आले. भाजी विक्रेते मोहनलाल गुप्ता यांनी २००२ मध्ये पोट कापून पै-पैका जोडला आणि १८०० चौरस फुटाचा भूखंड वैभवानंद सोसायटीत विकत घेतला. सर्व कागदपत्रे असूनही ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंडांनी त्यावर अनधिकृत कब्जा करून गुप्तांना हाकलून लावले. पुन्हा येथे आला तर येथेच गाडून टाकेन, अशी धमकीही दिली.

—-
रातोरात कब्जा
(वसंतराव डंभारे )
वसंतराव डंभारे आणि त्यांची पत्नी तसेच अन्य तीन नातेवाईकांनी एकत्रपणे ३,६०० (प्रत्येकी १२००) चौरस फुटाचा भूखंड घेतला. १९९९ मध्ये ग्वालबन्सी आणि त्याच्या साथीदारांनी रातोरात त्यावर कब्जा केला. उजर केला असता डंभारे दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
—-
३३ वर्षांनंतर दिलासा
जसपाल भूषणवार
याच बाजूला जसपाल भूषणवार या वृद्धाने येथे १८०० चौरसफूटाचा भूखंड घेतला. १९८४ ला त्यांनी आपल्या आयुष्याची कमाई या भूखंडात गुंतवली. कर्ज घेऊन घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, ग्वालबन्सी टोळीने हा भूखंड बळकावून त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. त्यांना आता ३३ वर्षांनंतर त्यांचा भूखंड परत मिळाल्याने अत्यानंद झाला आहे.

त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा आणि परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश कलासागर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ग्वालबन्सीच्या जंगलराजचे खोदकाम सुरू केले. परिणामी मोठ्या प्रमाणावर तक्रारकर्ते समोर आले. अवघ्या एका आठवड्यात ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध सात गुन्हे दाखल झाले. आठवा गुन्हा गिट्टीखदान ठाण्यात शनिवारी दाखल झाला. त्यात नगरसेवक हरीश ग्वालबन्सीचेही नाव आहे. त्याच्यावरही विविध गंभीर आरोप आहेत.
अनेकांनी केले बांधकाम सुरू
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आश्वस्त झालेल्या भूखंडधारक आणि जमीन मालकांनी आपापल्या भूखंडांचा ताबा घेणे सुरू केले आहे. मानकापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वैभवानंद सोसायटी आणि बाजूच्या भागात मुख्य रस्त्यालगत ग्वालबन्सीने ७६ आणि २६ भूखंडावर कब्जा केला होता. २० वर्षांपासून न्यायासाठी धावपळ करणाऱ्या नागरिकांनी शुक्रवारपासून आपापल्या भूखंडांवर जाऊन तेथे कुंपण भिंत घालण्याचे काम सुरू केले आहे. या नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
ग्वालबन्सीच्या गुन्ह्यांचा गंभीरपणा आणि व्याप्ती लक्षात घेत त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी गुरुवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती केली. परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश कलासागर यांच्या नेतृत्वात एसआयटी निर्माण करण्यात आल्याच्या २४ तासानंतरच कलासागर यांची अकोला येथे बदली झाली. त्यामुळे ग्वालबन्सीच्या गुंडांनी ‘हमरे भय्याजीने उनकी बदली किया’ अशी अफवा पसरवली. त्यामुळे सामान्य नागरिक पुन्हा भयग्रस्त झाले. मात्र, ही बदली नियमित बदली प्रक्रियेचा एक भाग असून, कलासागर यांच्या जागेवर नवीन उपायुक्त नेमला जाणार आहे. सामान्य नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, निर्भिडपणे पोलिसांकडे तक्रारी कराव्या आणि आपापली जमीन, भूखंड ताब्यात घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

येथेच गाडून टाकेन : गुप्ता
लोकमतने या भागात जाऊन पीडित नागरिकांशी चर्चा केली असता या भागातील नागरिकांमध्ये अक्षरश: आनंदोत्सव साजरा केला जात असल्याचे दिसून आले. भाजी विक्रेते मोहनलाल गुप्ता यांनी २००२ मध्ये पोट कापून पै-पैका जोडला आणि १८०० चौरस फुटाचा भूखंड वैभवानंद सोसायटीत विकत घेतला. सर्व कागदपत्रे असूनही ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंडांनी त्यावर अनधिकृत कब्जा करून गुप्तांना हाकलून लावले. पुन्हा येथे आला तर येथेच गाडून टाकेन, अशी धमकीही दिली.
रातोरात कब्जा : डंभारे
वसंतराव डंभारे आणि त्यांची पत्नी तसेच अन्य तीन नातेवाईकांनी एकत्रपणे ३,६०० (प्रत्येकी १२००) चौरस फुटाचा भूखंड घेतला. १९९९ मध्ये ग्वालबन्सी आणि त्याच्या साथीदारांनी रातोरात त्यावर कब्जा केला. उजर केला असता डंभारे दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
३३ वर्षांनंतर दिलासा : भूषणवार
याच बाजूला जसपाल भूषणवार या वृद्धाने येथे १८०० चौरसफूटाचा भूखंड घेतला. १९८४ ला त्यांनी आपल्या आयुष्याची कमाई या भूखंडात गुंतवली. कर्ज घेऊन घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, ग्वालबन्सी टोळीने हा भूखंड बळकावून त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. त्यांना आता ३३ वर्षांनंतर त्यांचा भूखंड परत मिळाल्याने अत्यानंद झाला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका
ग्वालबन्सीच्या गुन्ह्यांचा गंभीरपणा आणि व्याप्ती लक्षात घेत त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी गुरुवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती केली. परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश कलासागर यांच्या नेतृत्वात एसआयटी निर्माण करण्यात आल्याच्या २४ तासानंतरच कलासागर यांची अकोला येथे बदली झाली. त्यामुळे ग्वालबन्सीच्या गुंडांनी ‘हमरे भय्याजीने उनकी बदली किया’ अशी अफवा पसरवली. त्यामुळे सामान्य नागरिक पुन्हा भयग्रस्त झाले. मात्र, ही बदली नियमित बदली प्रक्रियेचा एक भाग असून, कलासागर यांच्या जागेवर नवीन उपायुक्त नेमला जाणार आहे. सामान्य नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, निर्भिडपणे पोलिसांकडे तक्रारी कराव्या आणि आपापली जमीन, भूखंड ताब्यात घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

थोडी खुशी, थोडा गम
पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करणाऱ्या अनेक पीडितांना अद्यापही धाक आहे. ‘साहेब बदलून गेल्यानंतर’ पुन्हा आमच्या जमिनीवर ग्वालबन्सी कब्जा करेल का, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. कारण यापूर्वी मानकापूरसह विविध पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी कर्तव्याशी बेईमानी करून ग्वालबन्सीच्या टोळीला मदत होईल, अशी भूमिका वठवित होते. त्यामुळे ही मंडळी आपल्या भूखंडावर दहशतीतच कुंपण घालत आहेत. शुक्रवारी रात्री येथे हे काम सुरू असताना ग्वालबन्सीचे साथीदार तेथे आले होते. त्यांनी कुंपण करणाऱ्यांकडे रोख करून तेथे भीती निर्माण होईल, अशा हालचाली केल्या. त्यामुळे संबंधितांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

बऱ्या बोलाने जमिनी परत करा : डॉ. व्यंकटेशम
ज्यांच्या कुणाच्या जमिनी ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंडांनी हडपल्या आहेत किंवा अन्य ज्या गुंडांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपल्या आहेत, त्यांनी पीडितांना तात्काळ त्यांची मालमत्ता परत करावी. त्यांच्याविरुद्ध एकदा तक्रार झाली तर त्यांची गय केली जाणार नाही, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिला. ज्यांच्याविरुद्ध तक्रार नाही अन् ज्यांनी स्वत:हून पीडितांना जमिन, भूखंड परत केला, अशाविरुद्ध जाणीवपूर्वक कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Hole of Gwalbansi Jungleraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.