नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:15 AM2017-09-29T01:15:36+5:302017-09-29T01:15:47+5:30

Holi celebrations of Nagpur deal and Kelkar committee report | नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी

नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी

Next
ठळक मुद्दे विदर्भ राज्य आंदोलन समिती : विदर्भात ५० ठिकाणी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. विदर्भाच्या जनतेशी करार करून त्यांच्याशी बेईमानी केली, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भात ५० ठिकाणी या नागपूर कराराची होळी करून या दिवसाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केळकर समितीच्या अहवालाची होळी करून त्यांचाही निषेध करण्यात आला.
नागपूर करारानुसार २३ टक्के विदर्भातील तरुणांना रोजगार देण्याचे मान्य केल्यावरही फक्त ८ टक्केच नोकºया दिल्या म्हणून विदर्भातील ४ लाख तरुणांचा रोजगार हिरावून येथील बेरोजगारांवर अन्याय केला. सिंचन व रस्त्यांचे एकूण १.५० लाख कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पळविले म्हणून विदर्भात धरणे रखडली. गावागावातील व शेतकºयांच्या शेतापर्यंतचे रस्ते थांबले. या सर्व प्रकारामुळे विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ५० वर्षे विकासामध्ये मागे पडला, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शहर समितीतर्फे दुपारी संविधान चौकात नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी केली. यावेळी विदर्र्भाच्या घोषणाही देण्यात आल्या तसेच भाजपा सरकार विरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुख्य निमंत्रक राम नेवले, शहर अध्यक्ष राजकुमार नागुलवार, अरुण केदार, विजया धोटे, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, धनंजय धार्मिक, महेंद्र भांगे, रवी घाडगे पाटील, नरेंद्र दौडकर, नीरज खांदेवाले, डॉ. पुरुषोत्तम भोंडे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मिशन विदर्भतर्फेसुद्धा संविधान चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली
ज्येष्ठ विदर्भवादी उमेश चौबे यांच्या अध्यक्षतेखाली माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, नितीन रोंघे, अनिल तिडके, विष्णू आष्टीकर, रवी गाडगे पाटील, तन्हा नागपुरी, अ‍ॅड. अविनाश काळे, दिलीप नरवडिया, सुनील खंडेलवाल, महेश मामीडवार, रामचंद्र देशमुख, नरेश निमजे, निखील भुते, अश्वजित पाटील, हिरासिंग ठाकूर, डॉ. शालिगाम चरडे, चंदू मोखारे, मनोज मालवी, अलीम खान, प्रभाकर बोरकर, सर्जेराव बाजीराव गलपट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
येथेही झाले आंदोलन
नागपूरसह चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, कोरपना, सावली, नागभीड, वरोरा, भद्रावती, चिमूर, यवतमाळमध्ये यवतमाळ, वणी, उमरखेड, पुसद, वर्धा-समुद्रपूर, हिंगणघाट, सिंदी रेल्वे, पुलगाव, अमरवाती-परतवाडा, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, वरुड, अंजनगाव, बुलडाणा-चिखली, मेहकर, मलकापूर, खामगाव, नागपूर- काटोल, नरखेड, उमरेड, भिवापूर, गडचिरोली-गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, वडसा, सिरोंचा, अहेरी, भंडारा-गोंदिया, अकोला, वाशिम आदींसह ५० ठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.

Web Title: Holi celebrations of Nagpur deal and Kelkar committee report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.