महात्मा फुले मार्केटमध्ये चिनी वस्तूंची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:36 PM2020-06-20T22:36:56+5:302020-06-20T22:38:35+5:30

महात्मा फुले सब्जी बाजार अडतिया असोसिएशनतर्फे बाजार परिसरात शनिवारी चिनी उत्पादनांचा बहिष्कार करण्याची शपथ सर्व अडतिये व व्यापाऱ्यांनी घेतली आणि पुतळा व चिनी साहित्यांची होळी केली.

Holi of Chinese goods at Mahatma Phule Market | महात्मा फुले मार्केटमध्ये चिनी वस्तूंची होळी

महात्मा फुले मार्केटमध्ये चिनी वस्तूंची होळी

Next
ठळक मुद्देशहीद जवानांना श्रद्धांजली : चिनी वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा फुले सब्जी बाजार अडतिया असोसिएशनतर्फे बाजार परिसरात शनिवारी चिनी उत्पादनांचा बहिष्कार करण्याची शपथ सर्व अडतिये व व्यापाऱ्यांनी घेतली आणि पुतळा व चिनी साहित्यांची होळी केली. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून चीनविरोधात नारेबाजी केली.
असोसिएशनचे अध्यक्ष शेख हुसेन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. देशातील संपूर्ण नागरिकांमध्ये रोष आणि एकतेची भावना आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्याची नागरिकांची तयारी आहे. यावेळी बाजार परिसरात वंदे मातरमचा जयघोष करण्यात आला. या प्रसंगी असोसिएशनचे सचिव राम महाजन, सहसचिव भूषण ठाकरे व राकेश बानाईत, सुरेश राऊत, अजय गौर, सलाम शेख, अमित गौर, रमेश संजुले, सुमित गौर, दीपक पटेल, राजा गौर, मुनेश माने, दिनेश नायक, प्रशांत कनोजे, नजीर आदी अडतिया आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Holi of Chinese goods at Mahatma Phule Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.