सुट्या फक्त विद्यार्थ्यांना, शिक्षकांना नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:57 AM2020-03-17T00:57:10+5:302020-03-17T00:57:53+5:30

कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना सुट्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आणि परीक्षेची कामे करावीच लागणार आहेत. शिक्षकांना कुठलीही सुटी नाही, असे शिक्षण अधिकारी (प्रा.) चिंतामण वंजारी यांनी सांगितले.

Holidays are just for students, not teachers! | सुट्या फक्त विद्यार्थ्यांना, शिक्षकांना नाहीत!

सुट्या फक्त विद्यार्थ्यांना, शिक्षकांना नाहीत!

Next
ठळक मुद्देशिक्षण अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण : शिक्षकांनी कुठलाही संभ्रम बाळगू नये

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना सुट्या आहेत. शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आणि परीक्षेची कामे करावीच लागणार आहेत. शिक्षकांना कुठलीही सुटी नाही, असे शिक्षण अधिकारी (प्रा.) चिंतामण वंजारी यांनी सांगितले.
शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनीसुद्धा स्पष्ट निर्देश दिले की, सुट्या केवळ विद्यार्थ्यांना द्याव्यात, शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाही. कोरोनाच्या विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासनाने शाळांना सुट्या जाहीर केल्या आहेत. महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या देण्यात आल्या. शासनाच्या निर्देशानंतर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपा हद्दीत असणाऱ्या शाळांच्या बाबतीत सुटीचे आदेश काढले. त्यामुळे शहर सीमेवर असलेल्या शाळांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कारण या शाळांमध्ये शहरातूनच मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी बैठक घेऊन नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील शाळा २५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले.
शासनाने शाळा बंद ठेवण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कुठलेही स्पष्ट निर्देश नसल्यामुळे शिक्षक संभ्रमात होते. यासंदर्भात सोमवारी अनेक शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे विचारणाही केली. त्यांना शिक्षण विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आले की फक्त विद्यार्थ्यांना सुट्या आहेत, शिक्षकांना नाही.
 शाळा बंद ठेवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची प्रतिकार क्षमता कमी असते. शिवाय शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने तो वाढू नये म्हणून विद्यार्थ्यांना सुट्या देण्यात आल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपली कार्यालयीन कामे व परीक्षेची कामे आहेत. ती कामे त्यांनी करावी, असे शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जायचेच आहे.
चिंतामण वंजारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.

Web Title: Holidays are just for students, not teachers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.