घरफाेडी करणारे दाेघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:10 AM2020-12-31T04:10:35+5:302020-12-31T04:10:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पाटणसावंगी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफाेडी करणाऱ्या दोन चाेरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून माेटरसायकल, राेख रक्कम ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफाेडी करणाऱ्या दोन चाेरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून माेटरसायकल, राेख रक्कम व माेबाईल असा एकूएा ८१ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या चाेरट्यांनी पाटणसावंगी येथे घरफाेडी केल्याचे कबूल केले, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई बुधवारी (दि. ३०) सकाळी करण्यात आली.
आशिष ऊर्फ दसचक्का नारायण कुशवाह (२३, रा. मरामायनगर, काटोल) व वैभव लक्ष्मण धवराळ (२०, रा. अर्जुननगर, काटोल), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. तीन दिवसापूर्वी पाटणसावंगी (ता. सावनेर) येथील दिलीप हरिहर कामडी यांच्यासह अन्य दाेन घरी भरदिवसा चाेरी झाली हाेती. त्यात चाेरट्यांनी ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला हाेता. यात चाेरट्यांनी दिलीप कामडी यांच्या घरून ३ लाख २० हजार रुपये, सुखदेव शेंडे यांच्या घरून १० हजार रुपये व मनीष काेहळे यांच्या घरून ५० हजार रुपये किमतीचा टीव्ही चाेरून नेला हाेता.
या घटनेचा सावनेर पाेलिसांसाेबतच स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपासाला सुरुवात केली. ही चाेरी आशिषने केल्याची माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला काटाेल शहरातून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली, शिवाय साथीदाराचे नावही सांगितले. त्यामुळे वैभवलाही ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्या दाेघांकडून पाेलिसांनी ५०,८०० रुपयाची एमएच-४०/बीडब्ल्यू-५६०४ क्रमांकाची माेटरसायकल, २१ हजार रुपयाचे तीन माेबाईल हॅण्डसेट व १०,६५० रुपये राेख असा एकूण ८१,६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
त्या दाेघांचा पाटणसावंगी परिसरात आठ घरफाेडी व चाेरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. त्यामुळे त्यांच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता बळावली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पाेलीस निरीक्षकद्वय राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षकद्वय नरेंद्र गाैरखेडे व जावेद शेख यांच्या पथकाने केली.