सावनेर, मनसर येथे घरफाेडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:11+5:302021-09-04T04:12:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/रामटेक : चाेरट्यांनी सावनेर शहरातील तेलीपुरा आणि रामटेक तालुक्यातील मनसर येथे घरफाेडी करून साेन्या-चांदीचे दागिने व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/रामटेक : चाेरट्यांनी सावनेर शहरातील तेलीपुरा आणि रामटेक तालुक्यातील मनसर येथे घरफाेडी करून साेन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शाेध सुरू असल्याची माहिती सावनेर व रामटेक पाेलिसांनी दिली.
प्रतीक शरद काेल्हे, रा. तेलीपुरा, सावनेर हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेल्याने घरी कुणीही नव्हते. नेमकी हीच संधी साधून चाेरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने ४६ हजार रुपये किमतीचे साेन्याचे व एक हजार रुपयाचे चांदीचे असे एकूण ४७ हजार रुपये किमतीचे दागिने चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली.
राधाबाई आनंंद निंबाळकर, रा. मनसर, ता. रामटेक या कामानिमित्त मुलांना घेऊन माहेरी गेल्या हाेत्या. त्यामुळे त्याच्या घरी कुणीही नव्हते. दरम्यान, चाेरट्याने त्यांच्या घराच्या दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला व १० हजार रुपयाचा टीव्ही आणि १५ हजार रुपयाची साेन्याची अंगठी असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पाेबारा केला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी सावनेर व रामटेक पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुनहा दाखल केला आहे. या घटनांचा तपास अनुक्रमे पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे व पाेलीस हवालदार उकेबाेंद्रे करीत आहेत.