कुही परिसरात घरफाेडीसत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:11 AM2021-08-13T04:11:46+5:302021-08-13T04:11:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घरफाेडीसत्र सुरूच आहे. चाेरट्यांनी टाकळी व कळमना येथे भरदिवसा चाेरी करीत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घरफाेडीसत्र सुरूच आहे. चाेरट्यांनी टाकळी व कळमना येथे भरदिवसा चाेरी करीत एकूण ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. आठवडाभरातील चाेरीची ही सहावी घटना हाेय.
आनंदराव कवडू साेमकुवर (६२, रा. टाकळी, ता. कुही) हे त्यांच्या कुटुंबीयांसह साेमवारी (दि. ९) शेतात कामाला गेले हाेते. त्यांची मुलगी शेजारी गेली असतानाच चाेरट्याने घराच्या उघड्या दारातून आत प्रवेश केला. यात त्याने ४५ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने आणि १० हजार रुपये राेख असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला.
चाेरीची दुसरी घटना कळमना येथे मंगळवारी (दि. १०) दुपारी घडली. माेहम्मद जिलानी मिजबूल अन्सारी (२२, रा. धिरणपट्टी, जिल्हा मुजफ्फरनगर, बिहार) यांचे कळमना येथे दुकान आहे. ते बंद असताना चाेरट्याने कुणीही नसल्याचे पाहून पाच हजार रुपये किमतीचे साहित्य चाेरून नेले. या दाेन्ही घटनांमध्ये कुही पाेलिसांनी अनुक्रमे भादंवि ३८०, ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनांचा तपास पाेलीस उपनिरीक्षक सारिका गुरूकर व सहायक फाैजदार विजय कुमरे करीत आहेत.
...
तिघांना अटक
कळमना येथील दुकानातील चाेरी प्रकरणात कुही पाेलिसांनी संशयाच्या बळावर अब्दुल शकील शेख (३८, रा. माेठा ताजबाग, नागपूर), जामिल हफीज खान (३२, रा. संजय गांधीनगर, नागपूर) व शेख नफीज शेख युनूस (२५, रा. अयाेध्यानगर, नागपूर) या तिघांना ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान तिघांनीही कळमना येथील दुकानात चाेरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचे साहित्य व ७० हजार रुपयांचा एमएच-४०/ईपी-७१७ क्रमांकाचा ऑटाे असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिली. या चाेरट्यांकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.