मौद्यात सहा ठिकाणी घरफोड्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:39+5:302021-09-02T04:18:39+5:30

मौदा : मौदा शहरात चोरीच्या घटनात सातत्याने वाढ आहे. मंगळवारी (दि. ३१) शहरातील नर्मदेश्वर शिवमंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडली, तर ...

Home burglary in six places? | मौद्यात सहा ठिकाणी घरफोड्या?

मौद्यात सहा ठिकाणी घरफोड्या?

Next

मौदा : मौदा शहरात चोरीच्या घटनात सातत्याने वाढ आहे. मंगळवारी (दि. ३१) शहरातील नर्मदेश्वर शिवमंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडली, तर सहा ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केल्याची माहिती आहे. यात किती रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला याची माहिती बुधवारी रात्री उशिरापर्यंत मौदा पोलिसांकडून प्राप्त होऊ शकली नाही. यासंदर्भात पोलीस निरीक्षक विजय जाधव यांना विचारणा केल्यास गुन्हा दाखल झाल्यास माहिती देतो असे त्यांनी सांगितले. दरम्यान, दुपारी चोरी झालेल्या परिसरात श्वानपथक व फिंगरप्रिंट पथकांना पाचारण करण्यात आले होते. परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नाही. त्यामुळे आल्यापावली परत गेले.

--

बंद सीसीटीव्ही कधी सुरू होणार?

मौदा शहरात घरफोडीच्या घटना नव्या नाहीत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे नगराध्यक्षा भारती सोमनाथे, उपनगराध्यक्ष मुन्ना चलसानी, राजू सोमनाथे, रमेश कुंभलकर, देवीदास कुंभलकर, मोहनदास भोंगाळे यांनी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर व पोलीस निरीक्षक हेमंत कुमार खराबे यांना केली आहे.

Web Title: Home burglary in six places?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.