‘म्युझिकल फाउंटन’ पाहून भारावले गृहमंत्री अमित शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 11:07 PM2023-02-17T23:07:51+5:302023-02-17T23:08:26+5:30

Nagpur News ‘लोकमत’तर्फे शनिवारी आयोजित महासोहळ्यानिमित्त नागपुरात आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी रात्री फुटाळा तलावावरील ‘म्युझिकल फाउंटन’ व ‘लेझर शो’ला उपस्थिती लावली.

Home Minister Amit Shah was overwhelmed by the 'musical fountain' | ‘म्युझिकल फाउंटन’ पाहून भारावले गृहमंत्री अमित शाह

‘म्युझिकल फाउंटन’ पाहून भारावले गृहमंत्री अमित शाह

googlenewsNext

नागपूर : ‘लोकमत’तर्फे शनिवारी आयोजित महासोहळ्यानिमित्त नागपुरात आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी रात्री फुटाळा तलावावरील ‘म्युझिकल फाउंटन’ व ‘लेझर शो’ला उपस्थिती लावली. हा ‘शो’ पाहून अमित शाह भारावले व त्यांनी याचे कौतुक केले. ‘शो’ संपल्यानंतर नागपूरकरांसमोर येऊन त्यांनी अभिवादन केले व नेत्यांशी बोलताना त्यांनी या प्रकल्पाबाबत कौतुकोद्गार काढले.

अमित शाह येणार असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. रात्री साडेआठच्या सुमारास शाह यांचे आगमन झाले व लगेच ‘शो’ला सुरुवात झाली. शाह यांनी टाळ्या वाजवून या ‘शो’ला दाद दिली. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, आ.कृष्णा खोपडे, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Home Minister Amit Shah was overwhelmed by the 'musical fountain'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.