निराश्रित विद्यार्थी दत्तक याेजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:49+5:302021-07-07T04:10:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : काेराेनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील निराश्रित बालकांना दत्तक घेत कन्हान येथील धर्मराज प्राथमिक शाळेने सामाजिक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : काेराेनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील निराश्रित बालकांना दत्तक घेत कन्हान येथील धर्मराज प्राथमिक शाळेने सामाजिक बांधीलकी जपली आहे. निराश्रित विद्यार्थी दत्तक याेजनेंतर्गत मंगळवारी (दि. ६) यश देवेंद्र शेंदरे या विद्यार्थ्याला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देऊन शाळेतर्फे दत्तक घेण्यात आले. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून स्वागत हाेत आहे.
काेविड निराश्रित विद्यार्थी दत्तक याेजनेअंतर्गत विद्यार्थ्याला प्राथमिकचे पूर्ण शिक्षण, शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती याेजनेचा लाभ व इतर बाबींकरिता शाळेकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे या माेहिमेचे प्रमुख भीमराव शिंदेमेश्राम यांनी सांगितले. निराधार, निराश्रित बालकांनी या याेजनेंतर्गत लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी दत्तक याेजनेचे प्रमुख खिमेश बढीये व भीमराव शिंदेमेश्राम यांनी केले. विद्यार्थी प्रवेशप्रसंगी विद्यार्थ्याचे काका नरेश शेंदरे, ऑटाे युनियनचे सदस्य मुकुंद उंब्रजकर, मुख्याध्यापिका आशा हटवार, खिमेश बढीये, भीमराव शिंदेमेश्राम, चित्रलेखा भाेयर, राजू भस्मे, लिखिता धांडे, अमित मेंघरे, किशाेर जिभकाटे, अपर्णा बावनकुळे, शारदा समरीत, प्रीती सेंगर, हर्षकला चाैधरी, आदी उपस्थित हाेते.