हा देशातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

By admin | Published: January 7, 2015 01:04 AM2015-01-07T01:04:30+5:302015-01-07T01:15:27+5:30

वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत अवघे जग पोहोचते. वृत्तपत्रे लोकांच्या घरापर्यंत पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कधीच मान मिळत नाही, ओळख मिळत नाही, ही खंत नेहमी वाटायती.

Honor to all Newspaper Vendors in this country | हा देशातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

हा देशातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

Next

गजानन मेश्राम गहिवरले : सेवा-सचोटीचे प्रतीक
नागपूर : वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत अवघे जग पोहोचते. वृत्तपत्रे लोकांच्या घरापर्यंत पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कधीच मान मिळत नाही, ओळख मिळत नाही, ही खंत नेहमी वाटायती. परंतु ‘लोकमत’ने वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंच्या शिल्पकृतीला केवळ साकारलेच नाही तर त्याचे लोकार्पण करण्याचा मान माझ्यासारख्या वृत्तपत्र विक्रेत्याला दिला.
ही ऐतिहासिक बाब असून हा केवळ माझाच नाही तर देशातील प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान आहे, हे सांगत असताना ५० वर्षांपासून हे कार्य करणाऱ्या गजानन मेश्राम या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्याच्या डोळ्यातील भाव बरेच काही सांगून गेले.
वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या कष्टाला सलाम करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृती’चे लोकार्पण मंगळवारी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेश्राम यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. शिक्षण चौथ्या वर्गापर्यंतच झाले असले तरी वृत्तपत्र वाचनाची आवड होतीच. मी २६ व्या वर्षी वृत्तपत्र वाटपाचे काम सुरू केले. त्यावेळी ४० घरी सकाळी वृत्तपत्र वाटप करायचो. थंडी असो, पाऊस असो अव्याहतपणे मी माझे काम सुरूच ठेवले. आज वयाच्या ७६ व्या वर्षीदेखील मी सायकलने दररोज २०० घरी वृत्तपत्र वाटतो. ५० वर्षे सतत मेहनत केली अन् त्याचे फळ आज मिळाले, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाचकांचे समाधान महत्त्वाचे
मेश्राम यांनी गेल्या पाच दशकात अनुभवलेल्या वृत्तपत्र क्षेत्रातील स्थित्यंतरावरदेखील भाष्य केले. अनेक वृत्तपत्रे आली, काही बंद पडली तर काहींनी अत्युच्च शिखरे गाठली. वृत्तपत्रांच्या कार्यप्रणालीतदेखील भरपूर बदल झाले. परंतु एक गोष्ट आजही कायम आहे; ती म्हणजे सकाळच्या वेळी वाचकांची वृत्तपत्र वाचण्यासाठीची तळमळ. एखादे दिवशी वृत्तपत्र उशिरा आले तर वाचक बेचैन होतात अन् ते दरवाजावर उभे राहून प्रतीक्षा करतात. ५० वर्षांपूर्वीदेखील असेच चित्र होते व आजही ते दिसून येते. अशा वाचकांच्या हाती वृत्तपत्राचा अंक पडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव नवीन स्फूर्ती देतात, अशा भावना मेश्राम यांनी व्यक्त केल्या.
७६ व्या वर्षी सायकलभ्रमंती
७६ वर्षीय गजानन मेश्राम यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक अनोखा पैलू समोर आला. ज्या सायकलवरून ते दररोज पेपर वाटप करतात, त्यावरून भ्रमंती करण्याची त्यांची आवड आहे. सुटीच्या दिवशी ते बरेच अंतर सायकलवरून फिरून येतात. मध्य प्रदेशातील बालाघाट, शिवनी इत्यादी ठिकाणी ते सायकलनेच प्रवास करतात. मागील वर्षी त्यांनी साकोली येथील एका लग्नसमारंभात सायकलने प्रवास करून उपस्थिती लावली होती, हे विशेष.

Web Title: Honor to all Newspaper Vendors in this country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.