देहदानाचा व्हावा सन्मान

By admin | Published: August 21, 2015 03:16 AM2015-08-21T03:16:06+5:302015-08-21T03:16:06+5:30

उपराजधानीत देहदान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु शासन आवश्यक सोयी उपलब्ध करून देत नाही....

Honor to the body | देहदानाचा व्हावा सन्मान

देहदानाचा व्हावा सन्मान

Next

शववाहिनीअभावी नातेवाईकांना अडचण : मेडिकल देते वाहतुकीचा खर्च
नागपूर : उपराजधानीत देहदान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु शासन आवश्यक सोयी उपलब्ध करून देत नाही त्यामुळे देहदान करणाऱ्यांना त्यांना हवी असलेली प्रतिष्ठा व सन्मान मिळत नसल्याचा आरोप होत आहे. बुधवारी अशाच प्रसंगाला एका कुटुंबाला सामोरे जावे लागले. आप्ताचे दु:ख बाजूला सारत वेळेवर धावपळ करून पार्थिव मेडिकलला सुपूर्द करावे लागले.
देहदान एक अनमोल दान आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्यास यामुळे मोठी मदत होते. परंतु आजही बहुसंख्य वैद्यकीय महाविद्यालयात पुरेसे देहदान होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. याची दखल घेत समाजामध्ये देहदानाच्या प्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी काही सामाजिक संस्थाकडून पुढाकार घेतला जात आहे.
भुर्दंड पडू नये म्हणून वाहतुकीचा खर्च देतो
मेडिकल महाविद्यालयांसाठी देहदान आवश्यक आहे. परंतु दान करणाऱ्यांवर भुर्दंड पडू नये म्हणूनच पार्थिव रुग्णालयापर्यंत आणून देण्याचा खर्च दिला जातो. या खर्चात गेल्या वर्षीच वाढ करून हजार रुपये करण्यात आले आहे. मेडिकलकडे पार्थिव आणण्याची सोय उपलब्ध नाही. परंतु हजार रुपयांत मेडिकल मृतदेहाची खरेदी करतो, असे जर कुणी म्हणत असेल तर हा खर्चही देणे आम्ही बंद करू.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल
वाहन उपलब्ध होणे आवश्यकच
देहदानाची इच्छा व्यक्त करणाऱ्यांचे पार्थिव महाविद्यालयांपर्यंत आणण्याची जबाबदारी संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांनी घ्यावी, असे निर्देश १९९० मध्ये तत्कालीन राज्यपालांनी दिले होते. परंतु मेडिकलमध्ये शववाहिनी नाही, ती महापालिकेकडे आहे. यामुळे महापालिकेने यात पुढाकार घेऊन शववाहिनी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, शववाहिनी उपलब्ध झाल्यास देहदानात पैशाचा व्यवहार होणार नाही, तो होऊ नये असाच आमचा प्रयत्न आहे.
-चंद्रकांत मेहर, सदस्य, देहदान समिती, मेडिकल

Web Title: Honor to the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.