धोबी समाज महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:07 AM2021-09-13T04:07:01+5:302021-09-13T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) वरठी समाज महासंघ (सर्व भाषिक)च्या वर्धापन दिनानिमित्त अयोध्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) वरठी समाज महासंघ (सर्व भाषिक)च्या वर्धापन दिनानिमित्त अयोध्या नगर येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी उद्घाटन केले. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी. डी. सोनटक्के अध्यक्षस्थानी, तर मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. अशोक गव्हाणकर उपस्थित होते. नोकरीच्या वाटा व करिअर यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितांत रूकेश मोतीकर, भैयाजी रोहणकर, संजय कनोजीया, दयाराम हिवरकर, माणिक भोस्कर, अशोक क्षीरसागर, सुनील श्रीवास, उज्ज्वला कामरकर, नंदा क्षीरसागर, संदीप खेडकर, जितेंद्र सौदागर, आदींचा समावेश होता.
महासंघाचे शहर पदाधिकारी रत्नमाला सोनटक्के, माया मोतीकर, मीरा मोतीकर, जया मोतीकर, प्रीती निंबुरकर, राजकुमार आवळेकर, आशिष निंबुरकर, राजेश वाघमारे, मंसाराम हिवरकर, पुरुषोत्तम लोखंडे, प्रमोद बडनाग, सचिन क्षीरसागर, प्रवीण मदनकर, श्याम काटकर, संदीप भोस्कर, प्रवीण तुरणकर, निरंजन नाकाडे, विलास नाकाडे, महेश तिडके, दिलीप तुरणकर, मधुसूदन दौडकर, प्रदीप मदनकर, राम काळबांडे, पांडुरंग लोणारे, नारायण पाटणकर, सुरेंद्र वानखेडे, संजय क्षीरसागर, सर्वेश कंडारकर, किशोर तरुडकर, नीलेश तरुडकर, संजय माहुरकर, सुरेश तुरनकर, संदीप दख्खनकर, अजय तरुडकर, रमेश आकोटकर, संजय देशकर, विशाल धोंगडे आदी उपस्थित होते. संचालन डॉ. राजेश क्षीरसागर यांनी केले. आभार वैभव ढगे यांनी मानले.