शहिद दिनानिमित्त नागपुरात वीरपत्नी सुषमा निराला यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:33 AM2018-03-24T11:33:49+5:302018-03-24T11:34:00+5:30

पतीच्या जाण्याचे दु:ख असले तरी, त्यांनी देशासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिल्याचा अभिमान आहे. त्यांना माझ्या मुलीला एअर फोर्समध्ये दाखल करण्याचे स्वप्न होते, त्यांचे स्वप्न मी पूर्ण करणार.

Honor of Veerapati Sushma Nirala in Nagpur on the occasion of Shahid Dynasty | शहिद दिनानिमित्त नागपुरात वीरपत्नी सुषमा निराला यांचा सन्मान

शहिद दिनानिमित्त नागपुरात वीरपत्नी सुषमा निराला यांचा सन्मान

Next
ठळक मुद्देशहिद कॉर्पोरेल ज्योतिप्रकाश निराला यांना श्रद्धांजलीमुलीला एअर फोर्समध्ये दाखल करण्याचे स्वप्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आतंकवादाची संकल्पना आता बदलली आहे. शाळा, रुग्णालये, मंदिरावर हल्ले करून, समाजाला अस्थिर करण्याचा आतंकवाद्यांचा डाव आहे. हा नवा आतंकवाद जनतेच्या मनात सरकारप्रति विरोध व सैन्याप्रति विभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे देशाच्या रक्षणासाठी आता समाजानेही सजग राहणे गरजेचे आहे. राष्ट्र रक्षणाचे प्रहरी बनल्याशिवाय नव्या आतंकवादाचा खात्मा करता येईल, असे मत डॉ. कुमार शास्त्री यांनी व्यक्त केले.
प्रहार समाज जागृती संस्थेच्यावतीने शहीद दिनानिमित्त कॉर्पोरल ज्योति प्रकाश निराला यांच्या बलिदानाला श्रद्धांजली देण्यासाठी व त्यांची वीरपत्नी सुषमा निराला यांच्या सन्मानाचा कार्यक्रम शुक्रवारी महर्षी व्यास सभागृह, रेशीमबाग येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता व अध्यक्ष म्हणून डॉ. कुमार शास्त्री बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एअर मार्शल सुनील सोमण, विशेष अतिथी म्हणून माजी आमदार मोहन मते व कर्नल सुनील देशपांडे उपस्थित होते. उपस्थितांच्याहस्ते सुषमा निराला यांचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी सुषमा निराला यांनी आपल्या पतीच्या बलिदानाबद्दल व्यक्त केलेल्या भावना ऐकून अख्खे सभागृह भावाकू ल झाले होते. पतीच्या जाण्याचे दु:ख असले तरी, त्यांनी देशासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिल्याचा अभिमान आहे. त्यांना माझ्या मुलीला एअर फोर्समध्ये दाखल करण्याचे स्वप्न होते, त्यांचे स्वप्न मी पूर्ण करणार, अशा गर्वाने त्या म्हणाल्या. पतीच्या गेल्यानंतरही त्यांची देशसेवेची तळमळ बघून, अख्ख्या सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला.
यावेळी एअर मार्शल सुनील सोमण यांनीही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी समाजाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. सैनिकांचा सन्मान करण्याबरोबरच, सशस्त्र बलात सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेच्या गरुड कमांडो, १३ राष्ट्रीय रायफलचे शहीद कॉर्पोरल ज्योति प्रकाश निराला यांच्या शौर्याची चित्रफित दाखविण्यात आली. ही चित्रफित बघताना प्रत्येकाच्या हृदयाला पाझर फुटला होता.

Web Title: Honor of Veerapati Sushma Nirala in Nagpur on the occasion of Shahid Dynasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.