ट्रकच्या हुकने नेले फरफटत: तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:05 AM2019-04-24T00:05:49+5:302019-04-24T00:09:41+5:30

अ‍ॅक्टिव्हाने ऑफीसला जात असताना मागून आलेल्या ट्रकच्या हुकमध्ये ओढणी अडकली आणि तरुणी ट्रकच्या मागच्या चाकाखाली ओढल्या गेली. त्यात अंदाजे ३० मीटर फरफटत गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडी परिसरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

The hook of the truck dragged : The girl died on the spot | ट्रकच्या हुकने नेले फरफटत: तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू

ट्रकच्या हुकने नेले फरफटत: तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपूरनजीकच्या वाडी परिसरात अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (वाडी) : अ‍ॅक्टिव्हाने ऑफीसला जात असताना मागून आलेल्या ट्रकच्या हुकमध्ये ओढणी अडकली आणि तरुणी ट्रकच्या मागच्या चाकाखाली ओढल्या गेली. त्यात अंदाजे ३० मीटर फरफटत गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडी परिसरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
पूजा ओमप्रकाश तिवारी (२८, रा. नवनीतनगर, वाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. पूजा वाडी-हिंगणा मार्गावर असलेल्या अजमेरा टायर्स या फर्ममध्ये अकाऊंटंटपदी वर्षभरापासून नोकरी करायची. ती नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी तिच्या एमएच-४०/बीबी-१३३० क्रमांकाच्या अ‍ॅक्टिव्हाने ऑफीसला जायला निघाली. महामार्गावरून जाताना मागून आलेल्या एमएच-१२/एमव्ही-४६०० क्रमांकाच्या ट्रकच्या मागचा लोखंडी हुक तिच्या ओढणीला अडकला.
परिणामी, तोल गेल्याने ती खाली कोसळली आणि ट्रकसोबत अंदाजे ३० मीटरपर्यंत फरफटत गेली. विशेष म्हणजे, तिने हेल्मेट परिधान केले होते. फरफटत गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला; शिवाय हेल्मेटचाही चक्काचूर झाला होता. या घटनेमुळे परिसरात तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पूजाचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला, शिवाय नागरिकांनाही शांत केले.
अपघात होताच ट्रकचालक शिवलाल रामप्रसाद शिंदे (३०, रा. टाकळखेड, ता. चिखली, बुलडाणा) याने घटनास्थळाहून पळ काढला होता, नंतर काही वेळाने तो पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी शिवलालविरुद्ध भादंवि ३०४ (अ), २७९ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात वाडी पोलीस करीत आहेत.
ओढणीने केला घात
पूजाचे वडील ओमप्रकाश तिवारी हे मूळचे बिहार मधील असून, ते ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीला असल्याने वाडी येथील नवनीतनगरात राहातात. पूजाला एक भाऊदेखील आहे. पूर्वी ती सेवा ऑटोमोबाईल्समध्ये नोकरी करायची. वर्षभरापूर्वी तिने अजमेरा टायर्समध्ये कामाला सुरुवात केली होती. शिवाय, शिवलालने वडधामना येथील टीसीआय एक्स्प्रेसमधून ट्रकमध्ये साहित्य घेतले आणि ओडिशामध्ये जायला निघाला होता. तिची ओढणी ट्रकच्या हुकमध्ये अडकली आणि घात झाला.

Web Title: The hook of the truck dragged : The girl died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.