कॅफे कबिलात हुक्क्याचा धूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:27+5:302021-06-25T04:08:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कबिला नामक कॅफेत पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या पथकाने छापा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कबिला नामक कॅफेत पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या पथकाने छापा मारला. पोलिसांना या छाप्यात अल्पवयीन मुलांसह सात जण हुक्का पिताना आढळले.
नवीन वस्ती मंगळवारी सदरमधील रहिवासी आरोपी परवेझ बबलू खान (वय २४) हा कॅफे कबिलात हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे परिमंडळ २ च्या उपायुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कुणाल धूरट, एस. बी. जाधव, हवालदार रामदास नेरकर, नायक गणेश जोगेकर, आशिष वानखेडे, शिपाई आबा मुंडे तसेच अमित भुरे यांनी गुरुवारी रात्री तेथे छापा मारला. या वेळी तेथे एका अल्पवयीन मुलासह सहा जण हुक्का पिताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कॅफेतून हुक्का पॉट तसेच विविध तंबाखूसारखे पदार्थ असा एकूण ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्री ११ वाजता सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
----