Maharashtra Grampanchayat Election; नागपूर ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीची घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 11:43 AM2021-01-18T11:43:47+5:302021-01-18T11:44:10+5:30
नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या मतदानाचे निकाल हाती येणे सुरू झाले आहे. सोमवारी सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या मतदानाचे निकाल हाती येणे सुरू झाले आहे. सोमवारी सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. हाती आलेल्या आतापर्यंतच्या निकालानुसार जिल्ह्यात सात ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.
यात खंडाळा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. नरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. अनिल देशमुख यांचे कट्टर समर्थक दिपक चौधरी यांच्या गटाचा विजय झाला आहे.
महालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस समथित गटाचे 04, भाजप 03,तर 03 अपक्ष भाजप बंडखोर विजयी झाले महालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनिल निधान यांच्या गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.