नागपुरातील हॉस्पिटलचे ऑडिट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:06 AM2021-01-10T04:06:58+5:302021-01-10T04:06:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अलीकडच्या काळात नागपूर शहराची मध्य भारतातील ‘वैद्यकीय हब’ अशी ओळख झाली आहे. ...

The hospital in Nagpur will be audited | नागपुरातील हॉस्पिटलचे ऑडिट होणार

नागपुरातील हॉस्पिटलचे ऑडिट होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अलीकडच्या काळात नागपूर शहराची मध्य भारतातील ‘वैद्यकीय हब’ अशी ओळख झाली आहे. नागपूर शहरात लहान-मोठे ६०० हून अधिक हॉस्पिटल्स आहेत. अग्निशमन यंत्रणा असेल तरच नवीन हॉस्पिटलला परवानगी दिली जाते. खबरदारी म्हणून शहरातील ८० इमारतींचे दर महिन्याला अग्निशमन विभागाकडून ऑडिट केले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सध्या शहरातील हॉस्पिटल्सचे अग्निशमन विभागामार्फत ऑडिट सुरू आहे.

उंच इमारती व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा लावणे अत्यंत गरजेचे आहे. ‘फिक्स फायर इन्स्टॉलेशन सिस्टीम’ असल्याशिवाय हॉस्पिटलला अग्निशमन विभागाकडून परवानगी दिली जात नाही. मात्र, शहरातील अनेक हॉस्पिटलचे प्रवेश अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे कुठलीही घटना घडल्यास या ठिकाणाहून लोकांना बाहेर काढणे कठीण होऊ शकते, अशी स्थिती आहे, तर काही हॉस्पिटलमध्ये आग लागल्यावर रुग्णांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेला रॅम्प नाही. तेथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

नागपूर शहरातील मेयो, मेडिकल रुग्णालयांचे बांधकाम जुने असून प्रशस्त जागेत आहे. येथे फर्निचरचाही फारसा वापर नाही. मात्र, धंतोली, रामदास पेठ यासारख्या भागांतील अनेक खासगी रुग्णालयांचे बांधकाम कमी जागेत करण्यात आले आहे.

नागपुरात ६०० हून अधिक हॉस्पिटल्स व नर्सिंग होम आहेत. यातील १५० हॉस्पिटल्स मोठ्या आस्थापनांच्या प्रकारात मोडतात. १५ मीटरपेक्षा उंच इमारतींचा यात समावेश आहे. अग्निशमन यंत्रणेच्या संदर्भात विभागातर्फे दरवर्षी शहरातील इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. यात त्रुटी आढळून आल्यास संबंधितांना नोटीस बजावून यंत्रणा उभारण्यास सांगितले जाते. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास वीज व पाणीपुरवठा खंडित करून इमारतीला असुरक्षित घोषित केले जाते. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, शहरातील हॉस्पिटल्सचे ऑडिट सुरू असल्याची माहिती मनपाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.च पी. चंदनखेडे यांनी दिली.

...

दर महिन्याला ८० इमारतींचे ऑडिट

शहरातील इमारती व हॉस्पिटल्समध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली अग्निशमन यंत्रणा आहे की नाही यासाठी दर महिन्याला ८० इमारतींचे ऑडिट केले जाते. आवश्यक असलेल्या उपाययोजनांची चाचपणी केली जाते. त्रुटी आढल्यास त्यांना सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल सांगण्यात येते. न केल्यास कारवाई केली जाते.

राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

...

पूर्तता प्रमाणपत्र आवश्यक

हॉस्पिटलला ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानतंर पूर्तता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. अग्निशमन उपाययोजना न करणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येते. त्यानंतरही उपाययोजना न करणाऱ्या इस्पितळांना धोकादायक घोषित केले जाते.

...

Web Title: The hospital in Nagpur will be audited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.