विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लहान मुलांसाठी रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:53+5:302021-06-05T04:06:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. लहान मुलांसाठी ...

A hospital for young children in the new administrative building of the university | विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लहान मुलांसाठी रुग्णालय

विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लहान मुलांसाठी रुग्णालय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. लहान मुलांसाठी कोविड रुग्णालयाचे वेळीच पूर्वनियोजन करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. याअंतर्गत मनपातर्फे लहान मुलांसाठी २०० खाटांचे कोविड रुग्णालय येथे प्रस्तावित आहे. यासंबंधात महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज नवीन प्रशासकीय इमारत विद्यापीठ परिसराचा दौरा केला. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे उपस्थित होते.

सध्या नागपूर विद्यापीठाचे कार्यालय येथील तळमजल्यावर सुरू आहे. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर ऑक्सिजन सोयीयुक्त १५० खाटा व ५० आय.सी.यू. खाटांचे लहान मुलांसाठीचे रुग्णालय प्रस्तावित आहे. या इमारतीमध्ये मोठे सभाकक्ष व खोल्या आहेत. सोबतच येथे पालकांना थांबण्यासाठीसुद्धा व्यवस्था केली जाईल. तसेच मनपातर्फे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी टी.व्ही.ची व्यवस्था असेल. ज्यामध्ये त्यांना कार्टून फिल्म दाखविल्या जातील. भिंतींवर कार्टून चित्रे असतील. मनपातर्फे पाण्याची व्यवस्था, ऑक्सिजन, खाटांची व्यवस्था करण्यात येईल. तसेच बालकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचीसुद्धा व्यवस्था केली जाईल. महापौरांनी या कार्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचीसुद्धा मदत घेण्याचे आवाहन केले आहे. या वेळी मनपा उपायुक्त मिलिंद मेश्राम, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, संजय दहिकर व महेश कुकडेजा आदी उपस्थित होते.

Web Title: A hospital for young children in the new administrative building of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.