नागपुरात ‘हॉट संडे’; नवतपामुळे लाहीलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:51 AM2019-05-27T09:51:36+5:302019-05-27T09:52:01+5:30

‘मे हीट’च्या तडाख्याने विदर्भातील जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने उपराजधानीत ४६ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

'Hot Sunday' in Nagpur; Navtapa starts | नागपुरात ‘हॉट संडे’; नवतपामुळे लाहीलाही

नागपुरात ‘हॉट संडे’; नवतपामुळे लाहीलाही

Next
ठळक मुद्देकूलरचा उपयोग नाही अक्षरश: आग ओकणाऱ्या या उन्हामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. तापमानामुळे घरांमध्ये कूलरचादेखील प्रभाव जाणवेनासा झाला आहे. सिलींग फॅन व टेबल फॅनमुळे तर आणखी गरम वाटत आहे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना तर आणखी त्रास सहन करावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मे हीट’च्या तडाख्याने विदर्भातील जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने उपराजधानीत ४६ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी तर पारा ४६.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपुरातच नोंदविण्यात आले. हवामान खात्याने विदर्भासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे येणारे दोन दिवस नागपूरकरांच्या परीक्षेचेच ठरणार आहेत.

काय आहे नवतपा?
उन्हाळ्याचे अखेरचे दिवस म्हणजे अंगावर काटा आणणारे ठरतात. याच दिवसात नवतपा सुरू होतो. नवतपा म्हणजे सूर्य जेव्ह ा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस असतात. ज्याची सुरुवात शनिवारी २५ मे पासून झाली आहे आणि ते ३ जूनला संपणार आहेत.
नवतपा सुरू झाल्यापासून नागपूरमध्ये अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच गरमी जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उष्ण वातावरण आहे. रविवारी नागपुरात कमाल ४६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ३ अंशांनी अधिक होते तर किमान ३०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाचा मारा अन् काही अंशी झालेली ढगांची गर्दी यामुळे उकाड्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण कोरडे झाले आहे. अजून आठवडाभर तापमान ४६ अंशांहून अधिकच राहील व उष्णतेची लाट कायम असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

२ अंशांहून अधिक वाढ
दरम्यान, मागील आठवडाभरात तापमानात दोन अंशांहून अधिक वाढ झाली आहे. २० मे रोजी नागपुरात ४४.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने पारा चढत गेला. लोकसभा निवडणूकांच्या निकालांच्या दिवशी ४६.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.

 

Web Title: 'Hot Sunday' in Nagpur; Navtapa starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.