हॉटेल समूह 'ओयो' करणार एक हजार कर्मचाऱ्यांची कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 10:43 PM2020-01-31T22:43:08+5:302020-01-31T22:45:12+5:30
‘ओयो’ ही जागतिक स्तरावरील हॉटेल समूह कंपनी असून ‘ओयो’ किचन आणि हॉटेलमध्ये निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने नफ्यात घट झाल्याने आणि टिकावात कमतरता आल्याच्या कारणाने एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ओयो’ ही जागतिक स्तरावरील हॉटेल समूह कंपनी असून ‘ओयो’ किचन आणि हॉटेलमध्ये निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने नफ्यात घट झाल्याने आणि टिकावात कमतरता आल्याच्या कारणाने एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
नोकर कपातीचा सर्वात मोठा परिणाम भारतात दिसणार आहे. ‘ओयो’चे चीननंतर भारतात सर्वाधिक कर्मचारी आहेत. ‘ओयो’भारतातील जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांपैकी १२ टक्के आणि चीनमधील १२ हजार कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे कंपनीच्या भविष्यातील विस्तारित योजनांवर परिणाम होणार आहे.
दरम्यान, कंपनीमध्ये नुकतेच रुजू झालेल्या अनेकांना विचारणा केली असता त्यांनी कंपनीच्या पुनर्रचनेसाठी कागदपत्रे ठेवण्यास सांगण्यात आल्याचे सांगितले. कर्मचाऱ्याने सांगितले की, मी आपल्या चमूमध्ये चांगली कामगिरी करणारा होतो. आता मला तेथून निघण्यास सांगितले आहे. मी त्यांना कारण विचारले असता त्यांनी मला आमच्या साच्यात बसत नसून तात्काळ नोकरी सोडण्यास सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना तातडीने नोकरी सोडायला सांगण्यापूर्वी पूर्वनियोजित राजीनाम्याच्या पत्रांवर सही घेतली. ओयोच्या प्रवक्त्याने सांगितले की, कर्मचाऱ्यांना पत्र जारी केले असून त्यांना नोटीस कालावधीचा पगार आणि सानुग्रह राशी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना काही काळापर्यंत वैद्यकीय संरक्षणही देण्यात आले आहे.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने दररोजच्या काही प्रक्रियेत कामकाजाची साधने व प्रयत्नांची नक्कल काढून ड्रायव्हिंगद्वारे सर्व कार्यक्षेत्रांमध्ये आपली कामे सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्रचनेचा व्यायाम हा टिकाऊ वाढ आणि कंपनीच्या आर्थिक विवेकबुद्धीच्या उद्देशाच्या अनुरूप आहे. सन २०१३ मध्ये स्थापना झालेली गुडगाव आधारित कंपनी अवघ्या सहा वर्षात एक बजेट हॉटेल बनली आणि त्याचा विस्तार भारतापासून अमेरिका, ब्रिटन आणि चीनपर्यंत झाला. या कंपनीने हॉटेल उद्योगात जागतिक स्तरावर बदल घडवून आणला आहे, हे उल्लेखनीय.