मनपाच कोरोनाचे हॉटस्पॉट; २२६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:03 PM2020-09-10T23:03:21+5:302020-09-10T23:04:43+5:30

शहरात सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव पसरत असतानाच महापालिकेमध्येही धोका वाढला आहे. मुख्यालयासह झोन कार्यालय, विविध विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आतापर्यंत २२६ जण पॉझिटिव्ह झाले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Hotspot of NMC Corona; 226 Positive | मनपाच कोरोनाचे हॉटस्पॉट; २२६ पॉझिटिव्ह

मनपाच कोरोनाचे हॉटस्पॉट; २२६ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव पसरत असतानाच महापालिकेमध्येही धोका वाढला आहे. मुख्यालयासह झोन कार्यालय, विविध विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आतापर्यंत २२६ जण पॉझिटिव्ह झाले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
मनपा कार्यालय सुरू असल्याने अनेक जण संपर्कात येतात. त्याचाच फटका येथील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्त अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २२६ जणांना बसला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामाविना येथे येण्याचे टाळावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
कोविडचा सर्वाधिक संसर्ग मनपाच्या शिक्षण विभागात झाला आहे. आतापर्यंत शिक्षण विभागातील ३६ अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून ४ जणांना जीव गमवावा लागला आहे. गांधीबाग झोन कार्यालयातील ३४ पॉझिटिव्ह रुग्णांमधून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हनुमाननगर झोनमध्येही २५ कर्मचारी कोरोनाबाधित असून दोघांचा मृत्यू झाला. मुख्यालयातील अग्निशमन विभागातील ३६, धरमपेठ झोन कार्यालयातील २५, सामान्य प्रशासन विभागातील २१, कर व कर आकारणी विभागातील १२, घनकचरा व्यवस्थापन विभागातील ८, आसीनगर झोन कार्यालयातील ७, नगररचना विभागातील ५, कपिल नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५, शेंडे नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४, हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २, क्रीडा व सांस्कृतिक विभागातील २, जाहिरात विभाग, जयताळा माध्यमिक शाळा आणि झोपडपट्टी भाडेपट्टा वाटप विभागातील प्रत्येकी १ जण कोविड पॉझिटिव्ह आहे.

अशी लक्षणे दिसताच चाचणी करा
ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास, जिभेला चव न येणे, वास न येणे अशी लक्षणे आढळल्यास किंवा कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तातडीने आपल्या नजीकच्या मनपा कोविड चाचणी केंद्रात जाऊन चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

या क्रमांकावर साधा संपर्क
कोविड चाचणी पॉझिटिव्ह असेल आणि लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी झोनच्या कॉल सेंटरवर फोन करून मार्गदर्शन घ्यावे. यासाठी ०७१२- २५५१८६६, ०७१२-२५३२४७४, १८००२३३३७६४ हे कॉल सेंटरचे क्रमांक आहेत. आपल्याला रुग्णालयात दाखल व्हायचे असेल आणि कुठल्या रुग्णालयात बेड्सची उपलब्धता आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर कॉल करावे.

महापौर कार्यालयालाही कोरोनाचा विळखा
महापौर संदीप जोशी यांच्या वाहनचालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापौर कार्यालयातील सर्वच कर्मचाºयांची चाचणी केली. महापौरांचे स्वीय सहायकही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महापौर संदीप जोशी आणि कार्यालयातील इतर सर्व कर्मचारी नियमानुसार गृहविलगीकरणामध्ये राहतील. महापौर यांच्यासह सर्व कर्मचाºयांचे दैनंदिन कामकाज घरून सुरू राहील.

Web Title: Hotspot of NMC Corona; 226 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.