भारनियमनामुळे अन्न सुरक्षेची ‘ऊर्जा’ संपुष्टात; केवळ चार दिवस ओलित करणे शक्य, शेतकरी चिंतेत

By सुनील चरपे | Published: December 2, 2022 12:50 PM2022-12-02T12:50:02+5:302022-12-02T12:59:17+5:30

कृषिपंपांना आठ तास वीजपुरवठा

hours of power cut in the state, farmers stressed due to food security threat due to low pressure power supply | भारनियमनामुळे अन्न सुरक्षेची ‘ऊर्जा’ संपुष्टात; केवळ चार दिवस ओलित करणे शक्य, शेतकरी चिंतेत

भारनियमनामुळे अन्न सुरक्षेची ‘ऊर्जा’ संपुष्टात; केवळ चार दिवस ओलित करणे शक्य, शेतकरी चिंतेत

googlenewsNext

नागपूर : थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यास अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याचा निवाडा राज्य अन्न आयाेगाने २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी दिला. राज्य माेठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. कृषिपंपांना राेज आठ तास वीजपुरवठा केला जाताे. भारनियमनामुळे आठवड्यातील केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेत असून, अन्न सुरक्षा धाेक्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

थकीत वीज बिलापाेटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने लाेकसंघर्ष माेर्चा जळगाव, भारतीय किसान संघ व शरद जाेशी विचार मंच शेतकरी संघटना यांनी राज्य अन्न आयाेगाकडे तक्रार केली हाेती. आयाेगाने यावर २१ ऑक्टाेबर २०२२ राेजी निवाडा दिला. शेतमालाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सिंचन आणि सिंचनासाठी अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे.

थकीत बिलांच्या वसुलीसाठी त्या भागातील ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद करणे, शेतातील वीजपुरवठा खंडित करणे, या बाबी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ चे कलम १६ व ३१ चा भंग करणाऱ्या आहेत. राज्यातील अन्न सुरक्षा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३, कलम १६ (६) (ग) नुसार या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देत असल्याचे आयाेगाने निर्णयात नमूद केले आहे.

राज्यात सध्या राेज १६ तासांचे भारनियमन केले जात असल्याने केवळ आठ तास थ्री फेज वीजपुरवठा केला जात आहे. आठवड्यातील चार दिवस दिवसा तर तीन दिवस रात्रीला थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत असताे. त्यामुळे केवळ चार दिवस ओलित करणे शक्य हाेते. उर्वरित तीन दिवस रात्री ओलित करण्यासाठी शेतात जाणे धाेकादायक ठरत आहे. वाढत्या भारनियमन आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अन्न सुरक्षा धाेक्यात आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

भारनियमनाची अखंडित २४ वर्षे

राज्यात सन १९९८ पासून भारनियमन केले जात आहे. वर्षागणिक भारनियमनाच्या काळ व वेळेत बदल करण्यात आले. यावर कायमस्वरूपी ताेडगा काढण्याऐवजी नागरिकांना भारनियमनाची झळ बसू नये म्हणून ग्रामीण भागात सिंगल फेज आणि थ्री फेजची स्वतंत्र विद्युत वाहिनी व ट्रान्सफाॅर्मरची व्यवस्था करण्यात आली.

शेतकऱ्यांचा मृत्यू

रात्रीच्या वेळी शेतात ओलित करण्यासाठी गेले वैजनाथ आबाजी आघाव (६०, रा. वाई, ता. सेलू, जिल्हा परभणी) यांचा साेमवारी (दि. २१ नाेव्हेंबर) शेतात आकस्मिक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कडाक्याच्या थंडीमुळे झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. महावितरण कंपनी वीजदुरुस्तीची कामे वेळेवर करीत नसल्याने पिके वाचविण्यासाठी ती कामे शेतकऱ्यांनाच करावी लागतात. ट्रान्सफाॅर्मर फ्यूज टाकताना शाॅक लागल्याने प्रवीण शालिग्राम परघरमाेर (३२, रा. देऊळगाव, जि. बुलढाणा) या तरुण शेतकऱ्याचा साेमवारी (दि. २८) सकाळी मृत्यू झाला.

राज्यातील पीक लागवड क्षेत्र

  • पेरणी क्षेत्र - १७४.८ लाख हेक्टर
  • रब्बी पिकांचे क्षेत्र - ७६.३६ लाख हेक्टर
  • फळबागांचे क्षेत्र - १३.५ लाख हेक्टर
  • उसाचे लागवड क्षेत्र - ८ लाख हेक्टर

राज्यातील शेतकऱ्यांकडील थकबाकी

  • ग्राहक - ४४,६३,७५४
  • एकूण थकबाकी - ४५,८४२.६५ काेटी रु.
  • सुधारित थकबाकी - ३०,३३६.८७ काेटी रु.
  • चालू देयके - १४,४२८.४४ काेटी रु.

Web Title: hours of power cut in the state, farmers stressed due to food security threat due to low pressure power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.