हल्ला करून घराला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:09 AM2021-03-31T04:09:29+5:302021-03-31T04:09:29+5:30

नागपूर : घराला आग लावण्याची धमकी देणाऱ्यांच्या विरोधात जरिपटका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गौतमनगर येथील रहिवासी अशोक पाटील रविवारी ...

The house was set on fire by the attackers | हल्ला करून घराला लावली आग

हल्ला करून घराला लावली आग

Next

नागपूर : घराला आग लावण्याची धमकी देणाऱ्यांच्या विरोधात जरिपटका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गौतमनगर येथील रहिवासी अशोक पाटील रविवारी रात्री कुटुंबीयांसह घरी झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास अभिजित नितनवरे व त्यांच्या पाच साथीदारांनी पाटील यांच्या घराच्या दाराला व खिडकीला आग लावली. पाटील यांना शिवीगाळ करत धमकी देऊन ते पसार झाले. जरिपटका पोलिसांनी दंगल घडविणे व आग लावण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

--------------

भाडेकरूचा महिला घरमालकावर हल्ला

नागपूर : रात्रीला भांडण न करण्याची समज दिल्यामुळे नाराज भाडेकरूने महिला घरमालकावर हल्ला केला. ही घटना रविवारी रात्री जुनी शुक्रवारी येथील कुणबीपुरा येथील आहे.

४५ वर्षीय सविता जितेंद्र खोकरे यांच्या घरी योगेश मधुकर जुमडे (४५) भाड्याने राहतो. रविवारी रात्री १२.३० वाजता योगेश आपल्या पत्नी व आईशी भांडत होता. आवाज ऐकून सविता योगेशच्या घरी आली आणि भांडण न करण्याची समज देऊन शेजाऱ्यांना शांततेने झोपू देण्याचे सांगितले. यावर चिडून योगेशने सविता यांच्यावर लाकडाने हल्ला चढवला. शिवीगाळ करत त्याने सविता यांना जखमी केले. खाली पडल्यामुळे सविता यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. कोतवाली पोलिसांनी योगेश जुमडे याच्या विरोधात हल्ला करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

----

माय-लेकांवर जीवघेणा हल्ला

नागपूर : क्षुल्लक कारणावरून महिला व तिच्या दोन मुलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. जयभीमनगर येथील रहिवासी १९ वर्षीय तरुण रंगारी रविवारी दुपारी घरासमोर उभा होता. त्याचवेळी तरुणचा मित्र प्रतीक खोब्रागडे (२१, रा. कौशल्यानगर) तेथे आला. त्यांच्यात प्रारंभी क्षुल्लक वाद झाला आणि नंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. दरम्यान, तरुणच्या हाताला असलेल्या कड्यामुळे प्रतीकच्या डोक्याला जखम झाली. प्रतीक तेथून निघून गेला आणि काही वेळाने तो रितिक खोब्रागडे या आपल्या भावासह परतला. त्यावेळी तरुणचा भाऊ साहिल पलंगावर झोपला होता. रितिकने छातीत चाकू भोसकून साहिलला जखमी केले आणि तरुणवर हल्ला चढवून त्यालाही जखमी केले. मुलांवर जीवघेणा हल्ला होत असल्याचे बघून त्यांची आई मधात आली. तेव्हा खोब्रागडे बंधूंनी तिलाही जखमी केले. अजनी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

...............

Web Title: The house was set on fire by the attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.