सर्वांसाठी घरे योजना; उद्दिष्ट १० हजारांचे; वाटप मात्र ९५ घरांचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 01:14 PM2020-10-12T13:14:01+5:302020-10-12T13:16:08+5:30

Housing scheme, Nagpur newsआर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे.

Housing plans for all; Target 10 thousand; Allocation of only 95 houses! | सर्वांसाठी घरे योजना; उद्दिष्ट १० हजारांचे; वाटप मात्र ९५ घरांचे!

सर्वांसाठी घरे योजना; उद्दिष्ट १० हजारांचे; वाटप मात्र ९५ घरांचे!

Next
ठळक मुद्देतांत्रिक कारणामुळे वाटपाला विलंबनासुप्रने ४३४५ घरे उभारली 

गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वांसाठी २०२२ पर्यंत घरे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना जून २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. नागपूर शहरासाठी १० हजार घरकुलांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यात महापालिकेतर्फे १११४, म्हाडा ५५७ व नासुप्र ४३४५ घरकुलांचे काम करीत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी असल्याने वाटप रखडले आहे.

नासुप्रतर्फे मौजा वाठोडा येथे २६४, मौजा तरोडी २३७४, मौजा वांजरी ७६५, मौजा तरोडी खूर्द येथे ९४२ अशा प्रकारे एकूण ४३४५ घरांचे बांधकाम केले आहे. यातील वाठोडा येथील ९५ घरांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित घरे बांधून तयार असून ती वाटपाच्या कार्यवाहीत असल्याची माहिती नासुप्रने युवा संस्थेचे नितीन मेश्राम यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे.

वांजरी येथील ७६५ घरांचे बांधकाम झाले आहे. परंतु पाण्याची लाईन टाकावयाची आहे. महापालिकेकडे हे काम देण्यात आले आहे. परंतु सहा महिन्यापासून काम रखडले आहे. अशीच परिस्थिती तरोडी येथील २३७४ घरकुलांची आहे. मनपा पाणी पुरवठा करणार आहे. जलकुंभाचे काम रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी घेताना दराबाबत वाटाघाटी सुरू होत्या. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून वीज पुरवठ्याला विलंब होत असल्याची माहिती आहे.

क्षमता नसलेल्या भागात घरांचे बुकींग
नासुप्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेतील घरकुलांच्या किमती वेगवेगळया आहेत. दुर्बल घटकातील नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज करताना अधिक रकमेच्या घरकुलांसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे परतफेड करण्याची क्षमता नसल्याने बँकाकडून कर्ज मिळण्याला अडचणी येत आहेत. तसेच अनेक अर्जधारक आधीच थकबाकीदार आहेत. यामुळेही घरकुल वाटपात अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लाभार्थीकडून हप्ते न घेता बांधकाम
घरकुलांचे बांधकाम करताना लाभार्थींनी तीन टप्प्यात घरकुलांची रक्कम जमा करणे अपेक्षित आहे. यात घरांचे बांधमाला सुरूवात करताना, स्लॅब टाकताना व घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पैसे जमा करणे अपेक्षित आहे. मात्र दुर्बल घटकांतील लाभार्थीकडून ही रक्कम आधीच घेतली असती तर घरकुलाचा ताबा मिळण्यापूर्वीच त्यांना बँकेच्या कजार्चे हप्ते भरावे लागले असते. याचा विचार करता नासुप्रने याची प्रतीक्षा न करता बांधकाम केले आहे.

Web Title: Housing plans for all; Target 10 thousand; Allocation of only 95 houses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर