ज्या राष्ट्राचे आरोग्य ठीक नाही, त्याची जीडीपी कशी ठीक राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:07 AM2021-05-15T04:07:30+5:302021-05-15T04:07:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोणत्याही संघटनेत किंवा देशामध्ये स्वत:च्या बजेटवर जीडीपीचा ५ टक्के भाग खर्च करणार नाही तोपर्यंत ...

How can the GDP of a nation whose health is not good? | ज्या राष्ट्राचे आरोग्य ठीक नाही, त्याची जीडीपी कशी ठीक राहील

ज्या राष्ट्राचे आरोग्य ठीक नाही, त्याची जीडीपी कशी ठीक राहील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोणत्याही संघटनेत किंवा देशामध्ये स्वत:च्या बजेटवर जीडीपीचा ५ टक्के भाग खर्च करणार नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्था ठीक करू शकत नाही. आरोग्य चांगले राहिले तरच अर्थव्यवस्था चांगली राहील, असे स्पष्ट मत सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केले. त्यांनी डॉक्टर व सर्व सेवाभावी संघटनांना लोकांची मदत करण्यासह त्यांच्या मनातील भीती दूर करण्यावर जोर देण्याचे आवाहन केले. त्यांना काही होणार नाही, हा विश्वास निर्माण करा. तेव्हाच समाजाची मदत करता येईल. त्यांनी ‘जितो’च्या उपक्रमाची प्रसंशा केली व या उपक्रमाने लोकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्यात विश्वास निर्माण होईल. हेल्पलाइन चांगली गोष्ट आहे व तिचा सांभाळून उपयोग करावा लागेल. अनेकांनी हेल्पलाइन सुरू केली; पण त्यांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. चांगले करणाऱ्यांची चर्चा होत नाही. मात्र, जराही चूक झाली की त्याचा आवाज मोठ्याने होतो. केवळ ‘जितो’ नाही तर प्रत्येक संघटनेच्या चांगल्या कामासोबत आम्ही २४ तास उभे राहू, असा विश्वास त्यांनी दिला.

‘लोकमत’ आणि सेवाभावी संघटना ‘जितो रोम जाेन’ यांच्या वतीने आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात ‘जितो कोविड हेल्पलाइन’चे उद्‌घाटन करण्यात आले. कार्यक्रमात आयएमए, नवी दिल्ली राष्ट्रीय महासचिव डॉ. जयेश लेले, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे (मुंबई), लोकमत मीडिया प्रा.लि.चे महाप्रबंधक मिलिंद दर्डा, जितो अपेक्सचे चेअरमन गणपतराज चौधरी (अहमदाबाद), व्हाइस चेअरमन विजय भंडारी (पुणे), अध्यक्ष सुरेश मुथा (चेन्नई), उपाध्यक्ष पारस भंडारी (बंगळुरू), महासचिव हितेश दोशी (गोरेगाव, मुंबई), जितो प्रोफेशनल फोरमचे चेअरमन अजय बोहोरा (नाशिक) व डायरेक्टर इनचार्ज मिलिंद शाह (नाशिक), रोम जोनचे चेअरमन कांतिलाल ओसवाल (पुणे), मुख्य सचिव अजय मेहता (पुणे) व कार्यक्रम समन्वयक डॉ. राजन संचेती, जितो अध्यक्ष ओमप्रकाश रांका (पुणे), जितो प्रोफेशनल फोरमचे झोन प्रोजेक्ट समन्वयक डॉ. अतुल जैन (नाशिक) प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात जेएलडब्ल्यू जोन समन्वयक पुणेच्या संगीता ललवानी-रुनवाल यांनी दर्डा यांचा परिचय दिला.

विजय दर्डा म्हणाले, ही हेल्पलाइन कोरोना संक्रमित रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढविण्यात व योग्य मार्गदर्शन करण्यात सहायक ठरेल. कोरोना संक्रमणामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. सतत वाढणारी संक्रमितांची संख्या आणि मृत्यू हे भीतीचे प्रमुख कारण आहे. या संकटापासून बचावासाठी लसीकरण हे परिणामकारक आहे. मात्र, लसींचा तुटवडा सर्वत्र दिसून येत आहे. लस मिळत नसल्याने लोकांमध्ये संभ्रम व भीती निर्माण होत आहे. एक वेळ अशी होती की आपल्या देशात लस निर्माता कंपन्या उभ्या होत्या. त्यांना मंजुरीची आवश्यकता होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेले नाही. अमेरिकेने संपूर्ण देशात लसीकरण पूर्ण केले. वर्तमान परिस्थितीत हेल्पलाइन अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल. हेल्पलाइन सुरू करताना मानवता कायम ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाला वेळेवर मदत मिळेल, हे निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल आणि त्यांच्यात विश्वास निर्माण होईल, अशी भावना दर्डा यांनी व्यक्त केली. लोकमत परिवार जितो संघटनेच्या कार्यात २४ तास सोबत राहील, असा विश्वास त्यांनी दिला. रोम जोनचे चेअरमन कांतिलाल ओसवाल यांनी स्वागत भाषण केले. जितो प्रोफेशनल फोरमचे चेअरमन अजय बोहोरा यांनी फोरम आणि संघटनेची माहिती दिली. ऑनलाइन कार्यक्रमाचे संचालन मिलिंद शाह यांनी केले. अतुल जैन यांनी आभार मानले.

Web Title: How can the GDP of a nation whose health is not good?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.