आरोग्य सेवाच आजारी, रुग्ण कसे बरे होणार ?

By admin | Published: April 26, 2017 01:25 AM2017-04-26T01:25:48+5:302017-04-26T01:25:48+5:30

शहरात मेयो व मेडिकल यासारखे मोठे हॉस्पिटल्स आहेत. परंतु येथे नागपूरसह विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगड अशा भागातील रुग्ण उपचारासाठी येतात.

How can the health care patient be sick? | आरोग्य सेवाच आजारी, रुग्ण कसे बरे होणार ?

आरोग्य सेवाच आजारी, रुग्ण कसे बरे होणार ?

Next

सदर रोगनिदान केंद्राची व्यथा : व्यवस्थेवर उपचाराची गरज
गणेश हुड/आनंद डेकाटे  नागपूर
शहरात मेयो व मेडिकल यासारखे मोठे हॉस्पिटल्स आहेत. परंतु येथे नागपूरसह विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगड अशा भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात रुग्णांची कायम गर्दी असते. महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार मिळाले तर या रुग्णालयावरील बराचसा भार कमी होऊ शकतो. परंतु महापालिकेची आरोग्य सेवा अपंग ( आजारी) झाल्याने येथे रुग्णांचा आजार बरा होण्याची शाश्वती राहिलेली नाही. महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयापाठोपाठ सदर येथील रोगनिदान व अनुसंधान केंद्रातील व्यवस्था कोलमडली आहे.
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नाागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिके ची आहे. त्यानुसार महापालिका रुग्णालयात उत्तम उपचार मिळत असल्याचा दावा पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा आहे. पण सदर रोगनिदान कें द्राला प्रस्तुत प्रतिनिधींनी भेट दिली असता, येथे अत्याधुनिक


आरोग्य सेवाच आजारी, रुग्ण कसे बरे होणार ?
यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा अभाव असल्याने यंत्रणा कोलडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा दावा सपशेल खोटा आहे.
उत्तर व दक्षिण-पश्चिम नागपुरात शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे दररोज या भागातील १०० ते १५० गरीब व गरजू रुग्ण सदर रोगनिदान केंद्रात उपचारासाठी येतात, परंतु पदरी निराशाच येते. रुग्णालयाची इमारत मोडकळीस आली आहे. रुग्णांना बसण्यासाठी चांगली सुविधा नाही. ओपीडीचा परिसर व्यवस्थित स्वच्छ केला जात नाही. ही इमारत हेरिटज असल्याने बांधकाम करता येत नाही, असे सांगण्यात आले. परंतु मोडकळीस आलेल्या भागाची डागडुजी व अंतर्गत दुरुस्तीची गरज आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिके कडे पाठविण्यात आला आहे. परंतु याकडे प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

इमारत मोडकळीस
रु ग्णालयाची जुनी इमारत हेरिटेज असल्याचे कारण सांगून डागडुजी व दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे ही इमारत मोडकळीस आली आहे. दर्शनी भागाच्या छतावर पालापाचोळ्याचा ढीग साचला आहे. वारा आला की हा कचरा खाली येतो. इमारतीच्या समोरील झाडाच्या बुंध्याचा ओटा तुटला आहे. यामुळे दगड व माती विखुरलेली आहे. इमारत मोडकळीस आली असून दुरुस्तीची गरज आहे.

औषधांचा तुटवडा
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडे चौकशी केली असता रुग्णांना काही गोळ्या मोफत दिल्या जातात तर काही औषधं बाजारातून खरेदी करण्यास सांगितले जाते, अशी माहिती मिळाली. मात्र यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता औषधांचा तुटवडा नसल्याचे सांगण्यात आले.

पॅथालॉजी नाही
अनेकदा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची रक्त, लघवी, थुंकी व अन्य प्रकारची तपासणी करणे गरजेचे असते. त्याशिवाय औषध देता येत नाही. परंतु पॅथालॉजीची व्यवस्था नसल्याने गरीब व गरजूंना खासगी पॅथालॉजीत तपासणी करावी लागते. यामुळे अनेकदा गरीब रुग्ण उपचार घेण्याचे टाळतात. यातून आजार बळावण्याचा धोका असतो.

एक्स-रे मशीनची सुविधा नाही
रुग्णांवर उपचार करताना अनेकदा एक्स-रे काढावा लागतो. परंतु सदर रोगनिदान केंद्रात ही व्यवस्था नाही. यामुळे खासगी रुग्णालयात एक्स-रे काढावा लागतो. यामुळे वेळेवर उपचार मिळत नाही, अशी माहिती रुग्णांनी दिली.

यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा अभाव असल्याने यंत्रणा कोलडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा दावा सपशेल खोटा आहे.उत्तर व दक्षिण-पश्चिम नागपुरात शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे दररोज या भागातील १०० ते १५० गरीब व गरजू रुग्ण सदर रोगनिदान केंद्रात उपचारासाठी येतात, परंतु पदरी निराशाच येते. रुग्णालयाची इमारत मोडकळीस आली आहे. रुग्णांना बसण्यासाठी चांगली सुविधा नाही. ओपीडीचा परिसर व्यवस्थित स्वच्छ केला जात नाही. ही इमारत हेरिटज असल्याने बांधकाम करता येत नाही, असे सांगण्यात आले. परंतु मोडकळीस आलेल्या भागाची डागडुजी व अंतर्गत दुरुस्तीची गरज आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिके कडे पाठविण्यात आला आहे. परंतु याकडे प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

इमारत मोडकळीस
रु ग्णालयाची जुनी इमारत हेरिटेज असल्याचे कारण सांगून डागडुजी व दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे ही इमारत मोडकळीस आली आहे. दर्शनी भागाच्या छतावर पालापाचोळ्याचा ढीग साचला आहे. वारा आला की हा कचरा खाली येतो. इमारत मोडकळीस आली असून दुरुस्तीची गरज आहे.
औषधांचा तुटवडा
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडे चौकशी केली असता रुग्णांना काही गोळ्या मोफत दिल्या जातात तर काही औषधं बाजारातून खरेदी करण्यास सांगितले जाते, अशी माहिती मिळाली. मात्र यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता औषधांचा तुटवडा नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: How can the health care patient be sick?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.