जी गोष्ट हातात नाही ती मुख्यमंत्र्यांनी कबुल कशी केली? नाना पटोले यांचा सवाल
By कमलेश वानखेडे | Published: November 17, 2023 07:20 PM2023-11-17T19:20:41+5:302023-11-17T19:21:22+5:30
Nana Patole : महाराष्ट्रात जाती जातीत वाद निर्माण करण्याचा भाजप काम करत आहे. सरकारचे चुकीचे नियोजन हे सगळ्यांच्या जीवावर बेतत आहे. जी गोष्ट हातात नाही ते मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण बाबत कबूल केले आहे.
- कमलेश वानखेडे
नागपूर - महाराष्ट्रात जाती जातीत वाद निर्माण करण्याचा भाजप काम करत आहे. सरकारचे चुकीचे नियोजन हे सगळ्यांच्या जीवावर बेतत आहे. जी गोष्ट हातात नाही ते मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण बाबत कबूल केले आहे. कुणबी प्रमाणपत्र सरसकट देऊ शकत नाही. मग मुख्यमंत्र्यांनी ते कसे कबूल केले, असा सवाल करीत मराठा आणि ओबीसी मध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला.
शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, ओबीसी आणि मराठा वादामुळे राज्यातील इतर प्रश्न मागे पडत आहे. अशी स्थिती इंग्रजांच्या काळात होती. गृहमंत्री यांच्या मुळे लाठीचार्ज आणि त्यावरील वक्तव्य या मुळे स्थिती बिघडली. ओबीसी आपले आरक्षण टिकविण्यासाठी लढत आहेत. तर जरांगे पाटील हे ओबीसी मधून आरक्षण मागण्यासाठी लढत आहेत. सर्व जातीचे सर्वेक्षण होण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. जातीनिहाय जनगणना हाच यावर एकमेव मार्ग आहे. दोन्ही समाजासाठी पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था राज्यात राहिलेली नाही. सरकार अहंकारामध्ये आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक चुकीचे दर्शन देशाला दाखवण्याचा काम चाललं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन आम्ही वंदन करतो. बाळासाहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व होत. त्यांचा विचार आणि आवाज आजही घुमतो आहे. इंदिरा गांधी यांना भेटायला बाळासाहेब ठाकरे गेले होते. तेंव्हा बाळासाहेबांनी आमोरासमोर प्रामाणिक मिका मांडली. ते क्षण आम्ही कधी विसरू शकत नाही. त्याकाळात धार्मिक पक्ष बंद करण्याचे निर्णय घेतला होता. बाळासाहेब यांच्या भूमिकेनंतर इंदिरा गांधी यांनी निर्णय बदलला होता, असेही पटोले यांनी सांगितले.
लोकसभेचा फार्म्युला ठरला नाही
लोकसभेच्या जागावाटपावर कुठलाही निर्णय झाला नाही. पाच राज्यांच्या निकालानंतर तीनही पक्ष सोबत बसून निर्णय घेतील. अजून फॉर्म्युला ठरला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे टाईमपास मंत्रिमंडळ
हे टाईमपास मंत्रिमंडळ आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीला १२ मंत्री अनुपस्थित राहत असतील महाराष्ट्राचे नुकसानच आहे. आधीच १७ जागा रिकाम्या आहेत. भाजप समोर जेव्हा पराभव दिसतो तेव्हा त्यांना देव आठवतो. कर्नाटक मध्ये हनुमानाचा सहारा घेतला पण तिथे पराभव झाला. राम सत्यासोबत असतो अस्त्यासोबत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.