बर्ड फ्लूची लागण झालीच कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:09 AM2021-01-21T04:09:55+5:302021-01-21T04:09:55+5:30
नागपूर : बुटीबोरी येथील वारंगा गावात बर्ड फ्लू आढळल्याने परिसरातील अनेक पक्षी नष्ट करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रात पक्ष्याच्या वाहतुकीवर ...
नागपूर : बुटीबोरी येथील वारंगा गावात बर्ड फ्लू आढळल्याने परिसरातील अनेक पक्षी नष्ट करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रात पक्ष्याच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली. येथे बर्ड फ्लूची लागण झालीच कशी, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यात पक्षी, कोंबड्या मृत पावल्याच्या चार घटना घडल्या. यातील तीन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर बुटीबोरीनजीकच्या वारंगा गावातील एका पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, या फार्ममध्ये ९५ कोंबड्या होत्या. येथील ४५ कोंबड्या मरण पावल्या होत्या. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एक किलोमीटर परिसरातील २६८ कोंबड्या मारून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथून बदकांची वाहतूक झाली होती. त्यांच्यापासून कोंबड्यांना लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज विभागाला आहे.
- बदकांच्या बाबतीत अद्याप माहिती नाही. परंतु याची चौकशी करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या. यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी माफसूच्या तज्ज्ञांचीसुद्धा मदत घेण्यात येणार आहे.
तापेश्वर वैद्य, सभापती, पशु व संवर्धन समिती, जि.प.