जिओटेक थर्ड पार्टी कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:19 AM2017-11-14T00:19:06+5:302017-11-14T00:19:38+5:30
नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सिमेंट रोडच्या कामांचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सिमेंट रोडच्या कामांचाही समावेश आहे. परंतु सुरू असलेली सिमेंट रोडची कामे निकृ ष्ट दर्जाची होत असल्याचे जनमंचला निरीक्षणादरम्यान निदर्शनास आले होते. शहरातील विकास कामे चांगल्या दर्जा$ची व्हावी म्हणून सिमेंट रोडच्या कामांचे ‘थर्ड पाटी आॅडिट’ करण्याची मागणी केली होती. परंतु सिमेंट रोडच्या कामाची मे.जिओटेकमार्फत चौकशी सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. पण गुणवत्ता शाश्वती व गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली मे.जिओटेक कंपनी थर्ड पार्टी कशी होणार, असा सवाल जनमंचने केला आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता विजय बनगिरवार यांना या संदर्भात पत्र दिले आहे. जनमंच अन्य थर्ड पार्टीकडून चौकशी करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे यात नमूद केले आहे.
सिमेंट रोडच्या टप्पा-१ मधील गे्रट नागरोडवरील जुनी शुक्रवारी पूल ते लोकांची शाळा या दरम्यानच्या सिमेंट रोडची जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात व तज्ज्ञांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली होती. यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. परंतु महापालिकेच्या अधिकाºयांनी जनमंचच्या चमूला वा पत्रकारांना कोणत्याही स्वरुपाची कागदपत्रे दाखविलेली नाहीत. जनमंचने या रस्त्यांच्या प्रमाणित निविदेच्या प्रतीची मागणी के ली होती. ती न मिळाल्याने या रस्त्याचे कंत्राटदार कोण, कामाचे तांत्रिक मानक, कंत्राटदाराला देण्यात आलेला दर, गुणवत्ता चाचणी अहवाल अशी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मिळालेली नाही.
तसेच वेस्ट हायकोर्ट रोडचे निरीक्षण करताना महापालिकेचा प्रतिनिधी नव्हता, असा दावा करण्यात आला. वास्तविक या रोडच्या निरीक्षणासंदर्भात जनमंचने महापालिकेला पत्र दिले होते. त्याची महापालिकेने दखल घेतली नाही. प्रतिसाद न मिळाल्याने जनमंचला एकतर्फी निरीक्षण करावे लागले. यावेळी योगायोगाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे येथे आले. त्यांनी महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांना बोलावून घेतले. या दोघांनाही या रोडची वस्तुस्थिती माहिती आहे. त्यामुळे महापालिकेचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. असा दोष जनमंचला देता येणार नाही. असे मुख्य अभियंता यांना दिलेल्या पत्रात जनमंचचे महासचिव नरेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
मनपाला आश्वासनाचा विसर
जिओटेककडे गुणवत्ता नियंत्रण व उत्तम दर्जाची जबाबदारी महापालिकेने सोपविली आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. परंतु या दोन बाबींवर शहरातील नागरिकांना व जनमंचला आक्षेप आहे. जनमंचने वेळोवेळी आपली भूमिका जाहीरपणे मांडली असून थर्ड पार्टी आॅडिटची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेवरून आयुक्त अश्विन मुदगल यांनी जनमंचच्या प्रतिनिधीसोबतच चर्चा केली होती. त्यावेळी राज्य सरकारकडे नोंदणीकृत अशा जनमंचच्या पसंतीच्या कोणत्याही एजन्सीमार्फ त सिमेंट रोडच्या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु महापालिकेला या आश्वासनाचा विसर पडला आहे.
निकृष्ट कामाला जबाबदार कोण
महापालिकेने जनमंचला बांधकामाच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. म्हणजेच महापालिका अजूनही थर्ड पार्टी चौकशीला तयार नाही. या प्र्रक्रियेत सहभागी झालो तर रस्त्यांचे बांधकाम चांगले होईल. परंतु जे दोषपूर्ण बांधकाम करण्यात आले आहे, त्याची जबाबदारी निश्चित कशी होणार, असा सवाल जनमंचने केला आहे. कोणत्याही थर्ड पार्टीमार्फत चौकशी करावी. यात जनमंचचा प्रतिनिधी सहभागी असावा, अशी मागणी जनमंचने केली आहे.
बांधकाम प्रक्रि येत सहभागाची तयारी
महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत यापुढे होणाºया बांधकाम प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्यास जनमंचची तयारी आहे. जनमंचचे अध्यक्ष अनिल किलोर व उपाध्यक्ष अमिताभ पावडे हे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतील. परंतु रस्ते बांधणीसंदर्भात संपूर्ण बाबींचा अभ्यास केल्यानंतरच यात सहभागी होता येईल. निविदा प्रक्रिया, त्यातील अटी व शर्थी, निविदेतील दर, कमी दराच्या निविदांची माहिती, सिमेंट काँक्रिटचे मिश्रण आदी बाबींची माहिती असणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.