परीक्षा अर्ज कसा भरायचा ?

By admin | Published: August 7, 2016 02:17 AM2016-08-07T02:17:41+5:302016-08-07T02:17:41+5:30

उन्हाळी परीक्षेसाठी त्यांना ५ आॅगस्टपर्यंतच अर्ज भरायचा होता. त्यामुळे गुणपत्रिका मिळणार कधी

How do I apply for the examination? | परीक्षा अर्ज कसा भरायचा ?

परीक्षा अर्ज कसा भरायचा ?

Next

 कारभार भोंगळ, निकालांचा गोंधळ
नागपूर : उन्हाळी परीक्षेसाठी त्यांना ५ आॅगस्टपर्यंतच अर्ज भरायचा होता. त्यामुळे गुणपत्रिका मिळणार कधी व अर्ज भरणार तरी कधी, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न दिल्यामुळे ‘एमएड’ प्रथम सत्राच्या परीक्षा या मार्च महिन्यात घेण्यात आल्या. परंतु निकाल जाहीर केला तर तांत्रिक अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेता नागपूर विद्यापीठाने या विद्यार्थ्यांचा निकालच जाहीर केला नव्हता. अखेर महाविद्यालयांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हिवाळी परीक्षांचे निकाल २० जुलै रोजी जाहीर करण्यात आले.
परंतु निकाल जाहीर झाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेलाच नाही. अद्याप विद्यार्थ्यांना त्यांचे नेमके गुणच कळलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या छापील गुणपत्रिका अद्याप महाविद्यालयांत पोहोचलेल्याच नाही. दुसरीकडे ‘आॅनलाईन’ निकालांचादेखील गोंधळच आहे. ‘आॅनलाईन’ गुणपत्रिकाच संकेतस्थळावर दिसत नसल्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. विभाग व महाविद्यालयांकडून विद्यापीठाला यासंदर्भात पत्रदेखील लिहिण्यात आले आहेत. परंतु याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही व विद्यार्थी निकाल जाणून घेण्यासाठी पायपीट करत आहेत.(प्रतिनिधी)

परीक्षा नियंत्रक अनभिज्ञ
यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांना संपर्क केला असता याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक कारणांमुळे संकेतस्थळावर निकाल दिसत नसेल. परंतु महाविद्यालयांच्या गुणपत्रिका छापून तयार आहेत. महाविद्यालयच गुणपत्रिका घ्यायला येत नसल्याचा दावा त्यांनी केला.
इतर विद्यार्थ्यांनादेखील बसला होता फटका
विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा यंदा इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील फटका बसला होता. ‘एमए’ (समाजशास्त्र) चतुर्थ सत्र, तृतीय सत्राचे निकालदेखील संकेतस्थळावर दिसत नव्हते. इतकेच काय तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे परीक्षा बैठक क्रमांक संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत नव्हते. अशा स्थितीत या त्रुटी दूर होण्याची अपेक्षा होती. परंतु असे काहीही झाले नसून ‘एमएड’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होत आहे.

 

Web Title: How do I apply for the examination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.