बस कुठे अडकली कसे कळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:12 AM2021-08-25T04:12:21+5:302021-08-25T04:12:21+5:30
नागपूर : घरून निघताना अनेकजण बसची चौकशी करतात. बस कधी येईल याची माहिती विचारतात. त्यासाठी एसटी महामंडळाने एक ॲप ...
नागपूर : घरून निघताना अनेकजण बसची चौकशी करतात. बस कधी येईल याची माहिती विचारतात. त्यासाठी एसटी महामंडळाने एक ॲप लाँच केले आहे. परंतु १५ ऑगस्ट होऊनही ते सुरू न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे बस कधी येणार आहे याचे नेमके लोकेशन प्रवाशांना समजत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.
- आगारनिहाय बसेसमध्ये बसविली यंत्रणा
आगार बसेस यंत्रणा किती बसविल्या
गणेशपेठ ७६ ७४
घाटरोड ७६ ७२
वर्धमाननगर ४९ ४६
इमामवाडा ५० ४८
१५ ऑगस्टचा मुहूर्त टळला
ॲप लाँच होणार आहे याचा मुहूर्त १५ ऑगस्टला ठरविण्यात आला होता. परंतु हा मुहूर्त सध्या लांबणीवर पडला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
- बस कुठे आहे हे आधीच कळणार
एसटी महामंडळाच्या वतीने हे ॲप लवकरच डाऊनलोड करण्यात येत आहे. बहुतांश बसेसमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली असून उर्वरीत बसेसमध्ये ही यंत्रणा बसविण्याची कारवाई सुरू आहे.
- लवकरच विदर्भ होणार स्मार्ट
विदर्भातील प्रवाशांना लवकरच आपल्या बसेसची माहिती मिळणार आहे. आम्ही बहुतांश बसेसमध्ये ही यंत्रणा बसविली आहे. उर्वरीत बसेसमध्ये लवकरच ही व्यवस्था करण्यात येईल.
शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती ३, मुंबई