कसे तुंबणार नाही पाणी ?
By admin | Published: April 20, 2015 02:05 AM2015-04-20T02:05:02+5:302015-04-20T02:05:42+5:30
ना विकास योजनेत समावेश ना अंमलबजावणी : २५० कोटीचा प्रस्ताव कागदावरच
राजीव सिंह नागपूर
देशभरातील ५ ‘टॉपटेन’ शहरात नागपूरचा समावेश होतो. येथील रस्ते, वीज, पाणी व हिरवळीकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. परंतु शहरातील पावसाळी नाल्या निर्माण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यात प्रशासनाला अपयश आले आहे.१५ वर्षापूर्वी शहर विकास आराखडा (डीपी प्लान) अमलात आला. परंतु यात पावसाळी नाल्याचा साधा उल्लेखही नाही. पावसाळ्याच्या दिवसात शहरातील अनेक वस्त्यात पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती होते. अनेकदा शहर जलमय झाले. अशा घटनामुळे २००६ मध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानात(जेएनएनयूआरएम) शहरातील पावसाळी नाल्याचा २४५ कोटीचा प्रस्ताव देण्यात आला. परंतु हा प्रस्ताव कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही.लोकमतने पावसाळी नाल्याची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.
विकासाकडे दुर्लक्ष
घराच्या बांधकाम नकाशाला रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा असेल तरच मंजुरी दिली जाते. त्या प्रमाणे रस्त्ते निर्माण करताना पावसाळी नाल्या निर्माण करणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. या नाल्या मोठ्या नाल्याशी जोडण्याची गरज आहे. पावसाच्या पाण्याचा वापर क ृषीसाठी व्हावा, परंतु विकास आराखड्यात याकडे दुर्लक्ष झाले आहे.
संजय कोपूलवार
आर्किटेक्ट व टाउन प्लॅनर्स