सिंचन कसे वाढणार?
By admin | Published: January 5, 2015 12:51 AM2015-01-05T00:51:12+5:302015-01-05T00:51:12+5:30
जिल्ह्यातील लघु पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे, मामा तलाव व पाटबंधाऱ्यासाठी भूसंपादन अशा कामांसाठी २०१४-१५ या वर्षात ८.४७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०१३-१४ या वर्षातील
जेमतेम २.५४ कोटी खर्च : तलाव-बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज
नागपूर : जिल्ह्यातील लघु पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे, मामा तलाव व पाटबंधाऱ्यासाठी भूसंपादन अशा कामांसाठी २०१४-१५ या वर्षात ८.४७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०१३-१४ या वर्षातील ४. ३८ कोटींचा अखर्चित निधी असा १३ कोटींचा निधी असतानाही डिसेंबर २०१४ पर्यंत जेमतेम २.५४ कोटींचा खर्च करण्यात आला. अशापरिस्थिीत जिल्ह्यातील सिंचन कसे वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.्र
बिगर अदिवासी क्षेत्रातील लघु सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती व त्यातील गाळ काढण्याची गरज आहे. जिल्ह्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील लघु पाटबंधाऱ्याच्या कामासाठी २५० लाखांची, कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी ३५० लाखांची तर मामा तलावांच्या दुरुस्तीसाठी १९ लाखांची तरतूद करण्यात आली होती. यातील जेमतेम २१ लाखांचा खर्च करण्यात आला.
आदिवासी क्षेत्रातील लघु पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे व मामा तलावांच्या दुरुस्तीसाठी ४५. ८२ लाखांची तरतूद करण्यात आली होती. ९.२७ लाखांचा खर्च करण्यात आला. अशीच परिस्थिती माडा ओटीएसी योजनेंतर्गत १७५ लाखांची तरतूद करण्यात आली होती.
यातील जेमतेम ४० लाखांचा खर्च करण्यात आला. गेल्या वर्षीच्या अखर्चित ४४८ लाखांपैकी जेमतेम ४० लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. याला आळा घालण्यासाठी सिंचन प्रकल्पाशिवाय पर्याय नाही.
त्यादृष्टीने शासनस्तरावर ठोस प्रयत्न होण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
२०४७ प्रकल्प
पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, मामा तलाव यांची संख्या २०४७ आहे. या प्रकल्पांची देखभाल व दुरुस्तीचा विचार करता वर्षाला १५ ते २० कोटी रु.ची असते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने मागील काही वर्षांत दुरुस्ती वा गाळ काढण्याची कामे झालेली नाही. जि.प.च्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा होते; परंतु तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे.
डोहाची कामे रखडली
सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने सिंचनाची कामे केली जातात. गेल्या वर्षात १३६ डोहाची कामे अपेक्षित होती. परंतु यातील ४३ कामे अद्याप प्रलंबित आहेत. काही कामाचा दर्जा निकृ ष्ट असल्याच्या सदस्यांच्या तक्रारी आहेत. या प्रकरणांची चौकशी होण्याची गरज आहे.