अधिवेशन किती दिवसांचे, आज शिक्कामोर्तब होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:17 AM2019-12-10T00:17:31+5:302019-12-10T00:19:12+5:30

नेमके किती दिवसांचे अधिवेशन राहील, यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. मंगळवारी मुंबईला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून, यात अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील, यावर शिक्कामोर्तब होईल.

How many days will the session be, confirm today! | अधिवेशन किती दिवसांचे, आज शिक्कामोर्तब होणार !

अधिवेशन किती दिवसांचे, आज शिक्कामोर्तब होणार !

Next
ठळक मुद्देमुंबईत कामकाज सल्लागार समितीची बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : यंदाचे हिवाळी अधिवेशन हे सहा दिवसाचे राहील, असे सांगितले जात असले तरी कामकाज मात्र ठरलेले नाही. त्यामुळे नेमके किती दिवसांचे अधिवेशन राहील, यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. मंगळवारी मुंबईला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून, यात अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील, यावर शिक्कामोर्तब होईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यांना विरोधकांच्या धारदार प्रश्नांनाही सामोरे जावे लागेल. मुख्यमंत्री याला कशाप्रकारे प्रतिउत्तर देतात, हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचेच असणार असल्याची चर्चा आहे. यावरून सरकारवर टीकाही होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नागपुरातील पहिले अधिवेशन सव्वादोन आठवडे चालले होते. त्यामुळे यावेळी किमान दोन आठवडे तरी अधिवेशन चालावे, अशी मागणी होत आहे. उद्या मंगळवारला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईला होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीला मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. ख्रिसमसपूर्वी अधिवेशन संपविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे एकच आठवडा हे अधिवेशन चालणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी एकदा अधिवेशन सहाच दिवस चालले आहे. विरोधी पक्षाने आग्रही भूमिका घेतल्यास अधिवेशनाच्या कामकाजात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

Web Title: How many days will the session be, confirm today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.