बिल गेट्सने चहाचे किती पैसे दिले? ‘इतक्या’ संपत्तीचा मालक आहे ‘डॉली चहावाला’! पाहा, कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 04:50 PM2024-03-04T16:50:15+5:302024-03-04T16:50:28+5:30

Nagpur Dolly Chaiwala News: ‘डॉली चहावाला’चा लॅम्बॉर्गिनी आणि सुपर बाइक सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे.

how much did bill gates pay for tea to dolly chaiwala know about education and income and property of nagpur dolly chai wala | बिल गेट्सने चहाचे किती पैसे दिले? ‘इतक्या’ संपत्तीचा मालक आहे ‘डॉली चहावाला’! पाहा, कमाई

बिल गेट्सने चहाचे किती पैसे दिले? ‘इतक्या’ संपत्तीचा मालक आहे ‘डॉली चहावाला’! पाहा, कमाई

Nagpur Dolly Chaiwala News: अब्जाधीश बिल गेट्स यांना चक्क नागपुरातील चहाविक्रेत्याच्या चहाने भुरळ घातली. बिल गेट्स यांनी चक्क त्या चहाविक्रेत्याला आमंत्रित करून डोळ्यासमोर चहा बनवताना पाहिले आणि चहा घेतला. तसेच त्याच्या कौशल्याबाबत कौतुकोद्गार काढले. खुद्द गेट्स यांनी ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, ‘डॉली चहावाला’ असे त्याचे नाव आहे. यानंतर आता बिल गेट्स यांनी चहाचे किती पैसे दिले, यावर ‘डॉली चहावाला’ने प्रतिक्रिया दिली आहे.

बिल गेट्स यांच्या भेटीबाबत बोलताना ‘डॉली चहावाला’ने सांगितले की, मला अजिबातच हे माहिती नव्हते की, ते कोण आहेत. मला असे वाटले की, ते एक परदेशी व्यक्ती आहेत आणि एका परदेशी व्यक्तीला मी चहा देत आहे. मी नागपूरला परत आलो, तेव्हा मला समजले की, डॉलीने कोणाला चहा पाजला. त्यांनी खूपच छान प्रतिक्रिया दिली, असे ‘डॉली चहावाला’ने सांगितले. तसेच मी फक्त चहा बनवण्याचे आणि त्यांना देण्याचे काम केले. दाक्षिणात्य चित्रपट पाहून, त्यांची कॉपी करून मी माझी स्टाइल बनवली आहे. त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचे पाहिले. मला याचा खूप आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने नागपूरचा ‘डॉली चहावाला’ झाल्यासारखे वाटत आहे.  बिल गेट्स चहा घेणार आहेत, याची अजिबातच कल्पना नव्हती. त्यांच्या टीमच्या बोलावण्यावरून आम्ही तिथे गेलो होतो. आपण नेमका कोणाला चहा दिला, हे समजल्यावर मला आता खूप अभिमान वाटत आहे. दिवसभर हसतमुखाने चहा बनवावा आणि लोकांना द्यावा तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील हसू अन् आनंद दिसावा, एवढीच इच्छा आहे, असे ‘डॉली चहावाला’ने सांगितले.

बिल गेट्सने चहाचे किती पैसे दिले?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स यांनी चहाचे किती पैसे दिले, याबाबत ‘डॉली चहावाला’ने भाष्य केले. नेहमी ज्याप्रमाणे ग्राहक चहासाठी येतात, त्याचप्रमाणे बिल गेट्स यांना चहा दिला. बिल गेट्स यांनी चहा घेतला. इतर लोक जेवढे पैसे देतात, तेवढेच पैसे दिले. माझ्या टपरीवर सात ते दहा रूपयांपर्यंत चहा मिळतो. मला बिल गेट्स यांनी तेवढेच पैसे दिले. मला अगोदर माहिती नव्हते की, हे बिल गेट्स आहेत, मला काहीच कल्पनी नव्हती. तसेच बिल गेट्स यांना चहा बनवून दिल्यानंतर आता भविष्यात कोणाला चहा द्यायला आवडेल, असे ‘डॉली चहावाला’याला विचारण्यात आले. तेव्हा त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, तर त्यांना नक्कीच चहा बनवून द्यायला आवडेल, अशी इच्छा ‘डॉली चहावाला’ने व्यक्त केली. 

‘इतक्या’ संपत्तीचा मालक आहे ‘डॉली चहावाला’!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘डॉली चहावाला’कडे १० लाख रुपयांची संपत्ती आहे. मात्र, बिल गेट्सने त्यांच्या टपरीवर चहा प्यायल्यानंतर तो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. अलीकडेच ‘डॉली चहावाला’चा लॅम्बॉर्गिनी आणि सुपर बाइक सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. ‘डॉली चहावाला’ हा गेल्या १६ वर्षांपासून महाराष्ट्रातील नागपुरात चहाचा स्टॉल लावत आहे. दहावीनंतर त्याने अभ्यास सोडला. अनेक चांगले लोक त्यांच्या चहाचे चाहते आहेत. त्यांच्या चहाच्या स्टॉलमधून त्यांची चांगली कमाई होते. त्याचे खरे नाव सुनील पाटील असल्याचे म्हटले जात आहे. ‘डॉली चहावाला’च्या स्टॉलवर जो कोणी चहा प्यायला येतो तो त्याच्या स्टाइल आणि चवीचा चाहता होतो, असे म्हणतात. बिल गेट्स यांनी त्याच्या टपरीवर चहा प्यायला, तेव्हापासून त्याला लॉटरी लागल्यासारखे वाटते आहे.

दरम्यान, नागपुरातील ‘डॉली चहावाला’ हा मागील अनेक काळापासून ‘सोशल मीडिया’वर प्रसिद्ध आहे. त्याचे मोठे फॅन फॉलोईंग असून चहा बनविण्याच्या त्याच्या हटके स्टाइलमुळे त्याचे व्हिडिओ व रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गेट्स यांना सोशल माध्यमांतूनच त्याच्याबाबत कळाले व त्यांनी एका हिल स्टेशनवर त्याला आमंत्रित केले. डॉलीने तेथेच एका हात ठेल्यावर स्टोव्ह मांडून गेट्स यांच्या डोळ्यासमोर चहा तयार केला. गेट्स त्याची प्रत्येक लकब व चहा बनविण्याची स्टाईल कौतुकाने पाहत होते. व्हिडीओच्या सुरुवातीलाच गेट्स ‘वन चाय प्लिज’ असे म्हणताना दिसतात व व्हिडिओत भारतात परत आल्याने रोमांचित असल्याचे गेट्स यांनी नमूद केले आहे.
 

Web Title: how much did bill gates pay for tea to dolly chaiwala know about education and income and property of nagpur dolly chai wala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.