नोटाबंदीनंतर किती पैसा बँकेत आला - प्रकाश आंबेडकर
By admin | Published: February 17, 2017 10:33 PM2017-02-17T22:33:34+5:302017-02-17T22:33:34+5:30
नोटाबंदीनंतर पाचशेच्या किती नोटा छापल्या गेल्या. दोन हजाराच्या किती छापल्या याची माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 - नोटाबंदीनंतर पाचशेच्या किती नोटा छापल्या गेल्या. दोन हजाराच्या किती छापल्या याची माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे.
परंतु नोटाबंदीनंतर नेमका किती पैसा बँकेत परत आला, याची आकडेवारी अजुनही का जाहीर केली जात नाही ? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केला.
भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर नगपुरातील इंदोरा मैदान येथे प्रचर सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, पक्षाचे ज्येष्ठ नेते मिलिंद पखाले, शहराध्यक्ष रामभाऊ काळे, डॉ. संदीप नंदेश्वर व्यापीठावर होते.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरीत चौफेर टीका केली. ते म्हणाले, बनावट नोटा या पाकिस्तानतर्फे छापल्या जातात. नोटाबंदीनंतर पाकिस्तानने छापलेल्या सर्व बनावट नोटा या बँकेत जमा झाल्या आहेत, असा आमचा आरोप आहे. त्यामुळेच बँकेत किती नोटा आल्या याची आकडेवारी सरकार जाहीर करायला घाबरत आहे.
एकीकडे लोकांना पैसे बँकेत जमा करायला सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे विजय माल्यांसारख्या लोकांचे लाखो कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कुणाचेही कर्ज माफ केले नसल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु त्यांनी हे वक्तव्य संसदेच्या सभागृहात करावे, असे आव्हान सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसरात्र स्वच्छतेचा नारा लावतात. परंतु स्वच्छता अभियानातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या स्वच्छता कामगाराकडेच त्यांचे दुर्लक्ष आहे. देशभरातील सफाई कामगारांवर जवळपास अडीच हजार कोटीचे कर्ज आहे. ते कर्ज नरेंद्र मोदी माफ करतील का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप सरकार कोणताही निर्णय विचारपूर्वक घेत नाही. मनात आले घेतला निर्णय असा भाजपचा कारभार आहे. मनात आले, नवाज शरीफ
यांना भेटायला गेले. मनात आले नोटाबंदी केली. अशा विचार न करणा-या सरकारला आणखी किती दिवस सहन करणार. यांचा मुख्य अजेंडा हा संविधान बदलणे हाच आहे. ह एकमेव निर्णय त्यांनी विचारकरून घेतला आहे. महापालिकेची ही निवडणूक केवळ ट्रायल आहे, खरी लढाई ही २०१९ ची निवडणूक राहणार आहे. तेव्हा आपले घर शाबूत आहे हे दाखवायचे असेल तर आताच निर्णय घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर नागपूरसह पूर्व नागुरातील खरबी चौक आणि दक्षिण नागपुरातील जाटतरोटी येथे आयोजित जाहीर सभेला सुद्धा मार्गदर्शन केले.
- नागपूरची मेट्रो अपयशी ठरणार
भाजप सरकार कोणताही निर्णय विचारपूर्वक करीत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे नागपूरची मेट्रो रेल्वे होय. वहतुकीचा अभ्यास असणा-यांनी ही मेट्रो फायद्याची ठरणार नाही, असे आधीच स्पष्ट केले आहे, त्यानंतरही मेट्रो रेल्वे केली जात आहे. परंतु ती निश्चित अपयशी ठरेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.