आणखी किती वेटिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:52 AM2017-10-22T01:52:09+5:302017-10-22T01:52:21+5:30

दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे.

How much waiting? | आणखी किती वेटिंग?

आणखी किती वेटिंग?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे. अनेक रेल्वेगाड्यात ‘रिग्रेट’ म्हणजे तिकीटही मिळत नसल्याची स्थिती आहे. दिवाळी संपेपर्यंत ही स्थिती अशीच कायम राहणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. प्रतीक्षा यादी वाढली असली तरी अनेक प्रवासी अधिक पैसे मोजून तात्काळच्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करताना दिसत आहेत.

दिवाळीत भाऊबीजेला येणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी असते. त्यामुळे या कालावधीत रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल होतात. दिवाळी आटोपल्यानंतर प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू होतो.
त्यामुळे दिवाळीनंतरही रेल्वेगाड्यात मोठी प्रतीक्षा यादी पाहावयास मिळते. यात नागपुरातून मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. दिवाळीनंतर २७ आॅक्टोबरपर्यंच्या स्थितीचा आढावा घेतला असता नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये ८० ते १५७ वेटिंग, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १२६, २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २७ आॅक्टोबरला १५० वेटिंग आहे तर १२२९० दुरांतो एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत १८२ वेटिंग आहे. नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये १२३ वेटिंग, २४ आॅक्टोबरला २८९ वेटिंग आहे.
दिल्लीकडे जाणाºया गाड्यात १२६५१ संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये २३ आॅक्टोबरला ४५ वेटिंग आणि २४ आॅक्टोबरला ४४ वेटिंग आहे. १२६१५ नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेसमध्ये २४ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. १२७२१ नागपूर-निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २३ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ आॅक्टोबरला ९५ वेटिंगची स्थिती आहे. हावडा मार्गावर १२८५९ नागपूर-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ९७ वेटिंग, २३ आॅक्टोबरला ८१ वेटिंग, २४ आॅक्टोबरला ८३ वेटिंग आहे.

१२१२९ आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ९८ वेटिंग, २३ आॅक्टोबरला ४२ वेटिंग आणि २५ आॅक्टोबरला ७१ वेटिंग आहे. १८०२९ शालिमार एक्स्पे्रसमध्ये २३ आॅक्टोबरला १०० वेटिंग, २४ आॅक्टोबरला ५२ वेटिंग आणि २६ आॅक्टोबरला ८२ वेटिंग आहे. चेन्नईकडे जाणाºया गाड्यात १२६१६ जीटी एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ८९ वेटींग आहे. तर १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ८१ आणि २३ आॅक्टोबरला ३८ वेटिंगची स्थिती आहे. रेल्वेगाड्यातील वेटिंगमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, त्यांना विना बर्थचा प्रवास करावा लागणार आहे. प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी अनेक प्रवासी तात्काळच्या रांगेत उभे राहून बर्थ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: How much waiting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.