मेयोमध्ये रुग्णांची संख्या कमी कशी? संचालक लहानेंची अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:30 AM2019-05-09T00:30:04+5:302019-05-09T00:31:21+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (मेयो) होणारा खर्च पाहता रुग्णांची संख्या कमी कशी, असा थेट प्रश्न विचारत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मेयोची उलटतपासणी केली. रुग्णसंख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी त्यांनी मेडिकल व मेयो रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीने दोन्ही रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली.

How to reduce the number of patients in Mayo? The sudden surprise visit of the director Lahane | मेयोमध्ये रुग्णांची संख्या कमी कशी? संचालक लहानेंची अचानक भेट

मेयोमध्ये रुग्णांची संख्या कमी कशी? संचालक लहानेंची अचानक भेट

googlenewsNext
ठळक मुद्देमेडिकलचीही केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (मेयो) होणारा खर्च पाहता रुग्णांची संख्या कमी कशी, असा थेट प्रश्न विचारत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मेयोची उलटतपासणी केली. रुग्णसंख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी त्यांनी मेडिकल व मेयो रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीने दोन्ही रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली.
डॉ. लहाने यांनी मेडिकलला सकाळी १० वाजता बाह्यरुग्ण विभागातून (ओपीडी) पाहणीला सुरुवात केली. यावेळी उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला. परिसरात विविध बांधकामे सुरू आहेत. त्यांचीही पहाणी करून कामाविषयी जाणून घेतले. प्रलंबित प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली.
रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयाची पाहणी केली. प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध विभागप्रमुख तसेच प्राध्यापकांसोबतही त्यांनी हितगुज केले. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, अधीक्षक डॉ. राजेश गोसावी व इतर वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मेडिकलमधून त्यांनी थेट मेयो रुग्णालय गाठले. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ‘ओपीडी’मध्ये शुकशुकाट पाहून आश्चर्यव्यक्त केले. रुग्णालयावर होणारा खर्च पाहता रुग्णांची संख्या कमी का, असा थेट प्रश्न विचारला. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.
रेडिओलॉजी विभागात ‘टोकन सिस्टम’ राबवा
डॉ. लहाने यांनी ‘ओपीडी’मध्ये असलेल्या रेडिओलॉजी विभागाची पाहणी केली. रुग्णांची संख्या आणि जागा पाहता ताळमेळ बसते का, असा थेट प्रश्न विचारला. रुग्णांच्या सोयीसाठी ‘टोकन सिस्टम’ राबविण्याचा सूचना केल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
‘एमआरआय’ची जागा पाहिली
खरेदी प्रक्रिया होऊन कंपनीकडून प्रतीक्षेत असलेल्या मेयोचा ‘एमआरआय’वर चर्चा केली; सोबतच स्थापन होणाऱ्या जागेची पाहणीही केली. त्यांनी ‘सिटी स्कॅन’च्या खरेदीबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचनाही केल्या. रुग्णालयातील स्वच्छतेबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुकही केले. यावेळी त्यांच्यासोबत अधिष्ठाता डॉ. अजल केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर, उपअधीक्षक डॉ. रवी चव्हाण, डॉ. सागर पांडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
आंबेडकर रुग्णालय होणार २५० खाटांचे
कामठी रोडवरील व मेयोच्या अधिपत्याखाली येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनुसंधान केंद्राची पाहणी यावेळी डॉ. लहाने यांनी केली. यावेळी मेयो प्रशासनाने या रुग्णालयाच्या पाठविलेल्या प्रस्तावावर चर्चाही केली. मेयोने या रुग्णालयासाठी २५० खाटांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. १३० कोटींच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात औषधवैद्यकशास्त्र, नेत्ररोग विभाग, मानसोपचार विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग व अस्थिरोग विभाग असणार आहे. प्रत्येक विभागाला ४०-४० खाटांचा वॉर्ड, अतिदक्षता विभाग व चार अद्ययावत अशी शस्त्रक्रियागृहे असणार आहेत.

Web Title: How to reduce the number of patients in Mayo? The sudden surprise visit of the director Lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.