मधुर गीतांचा ‘जिंदगी कैसी है पहेली’
By admin | Published: January 2, 2016 08:37 AM2016-01-02T08:37:24+5:302016-01-02T08:37:24+5:30
कलावंतांच्या हृदयात गाणे असतेच. मनाची प्रसन्नता गडद झाली की, ते ओठावर येते आणि श्रोत्यांच्या कानामनात
नागपूर : कलावंतांच्या हृदयात गाणे असतेच. मनाची प्रसन्नता गडद झाली की, ते ओठावर येते आणि श्रोत्यांच्या कानामनात स्थिरावते. डेक्कन युथ वेलफेअर आणि राजश्री संस्थेतर्फे नवोदित गायकांच्या ‘मिठी यादे - जिंदगी कैसी है पहेली...’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने गायकांनी उपस्थितांची दाद घेतली.
हा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन राजा ग्वालानी यांनी केले. कार्यक्रमात जफर शेख, पंडित मेश्राम, श्रीकांत दीक्षित, नंदा डोंगरे, राजा ग्वालानी, कांचन रामटेके, दिनेश जाधव, फिरोज खान, स्वाती चहांदे या गायकांचा सहभाग होता.
काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली सदाबहार हिंदी सिनेगीते या गायकांनी उत्साह, आनंद आणि तयारीने सादर केली. गायक जफरभाई सादरीत ‘सुरज की गर्मी से जलते हुअे तनको मिल जाये तरुवर की छाया..’ या प्रसन्न गीताने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर अनमोल घडी, चोरी चोरी, ज्युली, नागिन, शालिमार, हम किसी से कम नही, दिले नादा, आशिक आदी चित्रपटातील २१ गीते सर्वच गायकांनी ताकदीने सादर करून रसिकांना आनंद दिला.
‘आवाज दे कहाँ है.., भूल गया सबकुछ.., जिंदगी देनेवाले..., क्या हुआ तेरा वादा.., हम बेवफा हरगीज ना थे, दिल को देखो..., जिंदगी कैसी है पहेली हाये..., ऐसे तो ना देखो.., आजा सनम मधुर चांदनी मे हम..’ आदी गीते यावेळी तयारीने सादर करण्यात आली.
काही रोमांचक युगल गीते काही एकल गीते होती. कार्यक्रमाचे संचालन फिरोज खान यांचे होते. याप्रसंगी उद्योगपती प्रफुल्लभाई शाह, राजेश खरे, लखन सिंग, सुधीर मेश्राम, जयप्रकाश माथुर, तीश गजभिये, पब्रेम मद्रे आणि मधुरिका गडकरी यांचे स्वागत आयोजकांतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाला सिनेसंगीताचे दर्दी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)