प्रमाणपत्र नसतानाही एम्प्रेस मॉल सुरू कसा ?

By Admin | Published: November 3, 2016 03:37 AM2016-11-03T03:37:13+5:302016-11-03T03:37:13+5:30

महापालिकेने दिलेली मंजुरी, शासन निर्णय तसेच नियम धाब्यावर बसवून एम्प्रेस मॉलमध्ये अतिरिक्त

How to turn Empress Mall in the absence of a certificate? | प्रमाणपत्र नसतानाही एम्प्रेस मॉल सुरू कसा ?

प्रमाणपत्र नसतानाही एम्प्रेस मॉल सुरू कसा ?

googlenewsNext

नियमांची पायमल्ली : मनपाच्या नोटीसला केराची टोपली
नागपूर : महापालिकेने दिलेली मंजुरी, शासन निर्णय तसेच नियम धाब्यावर बसवून एम्प्रेस मॉलमध्ये अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही इमारतीचे बांधकाम केल्यानतंर व्यावसायिक वापर सुरू करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र व अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. परंतु मे.के. एस.एल.आणि इंडस्ट्रीज लि. यांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र न घेता एम्प्रेस मॉलचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे.
महापालिकेच्या धंतोली झोनचे उपअभियंता यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी याबाबत एम्प्रेस मॉल व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती.

बांधकाम नकाशाला मंजुरी नाही
इमारतीचे बांधकाम करताना नियमानुसार नगररचना विभागाची मंजुरी घ्यावी लागते. परंतु एम्प्रेस मॉलमधील खुल्या जागेवर अतिक्रमण करू न बांधकाम करण्यात आले आहे. तसेच भूखंड २ व ५ येथे मंजूर नकाशानुसार बांधकाम न करता अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेले आहे. नोटीस बजावल्यानंतरही भूखंड २ वरील अतिरिक्त बांधकाम हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे मे.के. एस.एल.आणि इंडस्ट्रीज लि. यांनी मंजुरीसाठी सादर केलेला नकाशा नगररचना विभागाने परत पाठविला होता.

Web Title: How to turn Empress Mall in the absence of a certificate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.