गॅस अनुदान बंद करून अच्छे दिन कसे येणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:58 AM2017-09-03T00:58:39+5:302017-09-03T00:58:59+5:30

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान ....

How to turn off gas subsidy and good days? | गॅस अनुदान बंद करून अच्छे दिन कसे येणार ?

गॅस अनुदान बंद करून अच्छे दिन कसे येणार ?

googlenewsNext
ठळक मुद्देअनिल देशमुख यांचा सवाल : मोठे आंदोलन उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरगुती सिलेंडरचे भाव ७ रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अनुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
देशमुख म्हणाले, सद्यस्थितीत एका घरगुती सिंलेडरमागे १५० रुपये अनुदान देण्यात येते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार असताना मी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा मंत्री असताना घरगुती गॅस सिलेंडवर मिळणारे अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करणारी योजना सुरु केली होती. परंतु आता भाजपा सरकार सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आुदान सोडण्याचे आवाहन केले. गरीब कुटुंबांना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले होते. परंतु याही योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेला फसविण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. जोपर्यंत कनेक्शनचे १६०० रुपये पूर्ण जमा होणार नाही तोपर्यंत सिलेंडरची सबसिडी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गॅस सिलेंडरसारखीच केरोसीनची सुध्दा सबसिडी बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. २०१६ पासून दर १५ दिवसाला २५ पैसे भाववाढ करण्यात येत आहे. शिवाय देशातील अनेक भाग केरोसीनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील कोट्यवधी गरीब कुटुंबास याचा फटका बसणार आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योगपतींचे हजारो करोड रुपयाचे कर्ज माफ करायचे आणि दुसरीकडे गरीब जनतेला देण्यात येणारे अनुदान बंद करायचे हे कसले धोरण आहे. भाजपाने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.

Web Title: How to turn off gas subsidy and good days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.