गॅस अनुदान बंद करून अच्छे दिन कसे येणार ? - अनिल देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 10:56 PM2017-09-02T22:56:07+5:302017-09-02T22:56:11+5:30
घरघुती गॅस सिलिंडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरघुती सिलिंडरचे भाव 7 रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अमुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
नागपूर, दि. 2- अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यत घरघुती गॅस सिलिंडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरघुती सिलिंडरचे भाव 7 रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अमुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
देशमुख म्हणाले, सध्स्थितीत एका घरघुती सिंलेडर मागे १५० रुपये अनुदान देण्यात येते. राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस व काँग्रेसरचे सरकार असतांना मी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा मंत्री असतांना घरघुती गॅसस सिलिंडवर मिळणारे अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करणारी योजना सुरु केली होती. परंतु आता भाजपा सरकार सामान्य नागरीकांना आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन करून अनुदान सोडण्याचे आवाहन केले. गरीब कुटुंबाना उज्वला योजनेच्या माध्यमातातून मोफत गॅस कॅनेक्शन देण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले होते. परंतु याही योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेला फसविण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. जोपर्यत कनेक्शनचे १६०० रुपये पूर्ण जमा होणार नाही तो पर्यत सिलिंडरची सबसीडी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गॅस सिलिंडर सारखेच केरोसनीनची सुद्धा सबसिडी बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. २०१६ पासुन दर १५ दिवसाला २५ पैसे भाव वाढ करण्यात येत आहे. शिवाय देशातील अनेक भाग केरोसीन मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील कोट्यवधी गरिब कुटुंबास याचा फटका बसणार आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योगपत्यांचे हजारो करोड रुपयाचे कर्ज माफ करायचे आणि दुसरीकडे गरीब जनतेला देण्यात येणारे अनुदान बंद करायचे हे कसले धोरण आहे. भाजपाने सर्व सामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचे काम सुरु केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.