रात्रीच्यावेळी नागरिकांना नोटीस कशा बजावल्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 01:57 AM2020-07-30T01:57:43+5:302020-07-30T01:59:11+5:30
महापालिकेव्दारे निर्माण करण्यात येणाऱ्या के.टी.नगर रुग्णालयांबाबत दर्शन कॉलनीमधील नागरिकांना मध्यरात्रीच्या वेळी नोटीस कशा बजावल्या, असा सवाल करून स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी यावर नाराजी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेव्दारे निर्माण करण्यात येणाऱ्या के.टी.नगर रुग्णालयांबाबत दर्शन कॉलनीमधील नागरिकांना मध्यरात्रीच्या वेळी नोटीस कशा बजावल्या, असा सवाल करून स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी यावर नाराजी व्यक्त केली.
मनपा सर्वसाधारण सभेत नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने महापौर संदीप जोशी यांनी झलके यांचे अध्यक्षतेखाली विविध प्रकरणावर चौकशी करण्याकरीता गठित समितीची बैठक बुधवारी मनपा सभागृहात झाली.
यावेळी समिती सदस्य विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अभय गोटेकर, विधी व सामान्य प्रशासन विशेष समिती सभापती धर्मपाल मेश्राम, बसपा नेत्या वैशाली नारनवरे व अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते.
झलके यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेतली. दिलेली माहिती असमाधानकारक असल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.